Headlines

या घरगुती उपायांनी तुमचे पिवळे झालेले दात फक्त ४ मिनिटात करा पांढरे शुभ्र, जाणून घ्या !

निर्मळ हसत राहिल्यास आरोग्य सुधारते त्यामुळे सतत हसत राहण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देत असतात. शिवाय फोटो काढताना हसून फोटो काढल्यावर तो चांगला येतो. मात्र हसताना आपले पिवळे दात दिसतील अशी चिंता अनेकांना सतावत असते. त्यामुळे शर्मे खातर लोक तोंड बंद करून हसतात.

हे पिवळे दात सफेद करण्यासाठी काही घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत ते तुम्ही नक्की करून पहा आणि फरक पहा.

४ मिनिटात पिवळे दात सफेद आणि चमकदार झाले तर ! दात सफेद करण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचा वापर करत असतात. मात्र यासाठी उगीच महागडी औषधे खरेदी करण्यापेक्षा आम्ही सांगत असलेले घरगुती उपाय करून पहा. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की दात साफ करण्याचे सोपे उपाय ज्यामध्ये तुम्हाला केवळ तुमच्या स्वयंपाक घरा पर्यंत जावे लागेल.

दात पिवळे झाले की दाताला कीड लागली की लोकांना त्याची चिंता लागून राहते. पण आता चिंता मुक्त व्हा आणि हा उपाय करून पहा. यासाठी तुम्हाला नारळाचे तेल घ्यायचे आहे. एक चमचा नारळाचे तेल तोंडामध्ये १५ ते २० मिनिटे ठेवा. त्यानंतर ब्रश करा. काही दिवसातच तुमचे दात मोत्यासारखे चमकायला लागतील.

आपल्या दातांसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. यासाठी तुमच्या सवयीं मध्ये थोडा बदल करावा लागेल. हा उपाय तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. विटामिन आणि पोषणयुक्त आहाराचे सेवन करा. शरीरात पोषणयुक्त घटकांची कमी असल्यास किंवा कॅल्शियमची कमी असल्यास दात पिवळे होऊ शकतात.

जर या घटकांचा अभाव तुमच्या शरीरात असेल तर तुम्ही कितीही उपाय केले तरीही तुमचे दात सफेद होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या आहारात विटामिन डी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहेत की नाही याची काळजी घ्या.
पिवळ्या दातांना सफेद करण्यासाठी स्वयंपाक घरात असलेल्या हिंगाचा वापर करू शकतात.

यासाठी तुम्ही पाण्यात हिंगाची पावडर टाकून ते पाणी उकळा आणि थंड करा. आता दिवसातून दोन वेळा या पाण्याच्या गुळण्या करा. असे केल्यास तुमचे दात सफेद होतीलच शिवाय तुमच्या दाताचे दुखणे देखील कमी होईल.

स्वयंपाक घरात असलेला बेकिंग सोडा देखील दातांचे पिवळेपणा दूर करू शकतो. यासाठी ब्रेकिंग सोडा तुम्ही दातांना चोळा किंवा टुथपेस्ट मध्ये घालून ब्रश करा. हवे असल्यास तुम्ही यामध्ये मीठ सुद्धा घालू शकता. पिवळ्या दातांना सफेद करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !