Headlines

केबीसी मध्ये १ करोड जिंकणाऱ्या विजेत्यांच्या हाती प्रत्यक्षात येतात एवढे रुपये, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

रोजच्या सासूसुनेच्या भांडणांच्या डेलिसोपपेक्षा अनेकजण रियालिटी शो पाहणे पसंत करतात. हल्ली रियालिटी शोचा टीआरपी सुद्धा वाढु लागला आहे. रियालिटी शो मध्ये अधिकतर नृत्य, संगीत, नाट्य या विषयांवर आधारित असतात. मात्र या विषयांच्या सिमारेषा तोडत केबीसी (कौन बनेगा करोडपती) हा शो देखील गेली २० वर्षे चालु आहे. या शो ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांचे ज्ञान देखील वाढवले.

या शो ने गेल्या २ दशकांत देशातील अनेक नागरीकांना करोडपती बनवले. एका एपिसोडमध्ये तर दोन भावांनी ७ करोड रुपये जिंकले होते. दुनियेसमोर भलेही हे लोक करोडपती असतील मात्र प्रत्यक्षात त्यांच्या हातात करोडो रुपये येत नाही. कसे ते चला जाणून घेऊ !

कौन बनेगा करोडपती शो मध्ये जिंकलेल्या पैशांवर टॅक्स लागतो. याच कारणामुळे १ करोड सारखी मोठी रक्कम जिंकूनही त्या विजेत्यांच्या नशिबात तेवढी रक्कम येत नाही. जिंकलेल्या रक्कमेला टॅक्स लागतो. ती टॅक्सची रक्कम कापून मग विजेत्याच्या खात्यात उर्वरित रक्कम टाकली जाते.

या शोमध्ये विजेत्यांनी जिंकलेल्या रकमेत 30% टॅक्स लागतो. हा नियम केवळ १ करोड जिंकणाऱ्या विजेत्यांनाच लागु होत नाही तर जर एखाद्या स्पर्धकाने १०,००० रु. जरी जिंकले असतील तरीही त्याने जिंकलेल्या रकमेतुन ३० टक्के टॅक्सची रक्कम कापली जाते.

एखाद्या स्पर्धकाने जर १ करोड रुपये जिंकले असतील तर कॅमेऱ्यासमोर त्याच्या खात्यात १ करोड रुपयेच टाकले जातात मात्र प्रत्यक्षात त्यांना हा पैसा टीडीएस कापुन मिळतो. इन्कम टॅक्स कलम १९४ बी नुसार स्पर्धकाला ३० टक्के रक्कम टॅक्स रुपी भरावाच लागतो. म्हणजेच जर एखाद्याने जर १ करोड रुपये जिंकले असतील तर टॅक्स म्हणून त्याच्या खात्यातून ३० लाख रुपये रक्कम कापली जाते.

एवढेच नव्हे तर जिंकलेल्या रकमेवर ४ टक्के सेस पण त्यांना भरावा लागतो. म्हणजेच एकुण मिळुन ३१.२० टक्के टॅक्स भरावा लागतो. ४ टक्के टॅक्स म्हणजे १ लाख २० हजार रु. याचा अर्थ १ करोड रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला ३१ लाख २० हजार रुपये भरावे लागतात.

अधिभार रक्कम सुद्धा भरावा लागतो – कोणत्याही रियालिटी शो मधून जिंकलेली रक्कम कलम ५६ नुसार INCOME FROME OTHER SOURCES मध्ये दाखवले जाते. जर कोणी केबीसी मध्ये ५० लाख ते १ करोड रुपये जिंकला असेल तर त्या स्पर्धकाला १० टक्के अधिभार रक्कम भरावी लागते. तर कोणी १ करोडहून अधिक रक्कम जिंकली असेल तर त्याला १५ टक्के अधिभार रक्कम भरावा लागतो.

केवढे मिळतात पैसे – या सर्व नियमांमुसार जिंकणाऱ्या स्पर्धकाला ३० टक्के टॅक्स + ४ टक्के एजुकेशनल सेस+ १० टक्के अधिभार रक्कम+ ४ टक्के सेस भरावा लागतो. त्यांनंतर त्या स्पर्धकाच्या खात्यात उर्वरित रक्कम भरली जाते. समजा एखाद्या व्यक्तीने जर १ करोड रुपये जिंकले तर तर त्याला ३१ लाख २० हजार रुपये टॅक्स भरावा लागेल. यावर १० टक्के अधिभार + ४ टक्के सीस सुद्धा भरावा लागतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !