Headlines

अमिशा पटेलचा बोल्ड व्हिडीओ व्हायरल, फॅन्स म्हणाले अशी सकीना असेल तर पाकिस्तान काय अमेरिकेसोबत पण … !

पूर्वीच्या काळी अंगभर कपडे घालून मिरवणाऱ्या अभिनेत्री सध्या लोप पावत आहेत. आताच्या काळात जितके तोकडे आणि बोल्ड कपडे तितकी प्रसिद्धी जास्त असा समज अभिनेत्रींचा झालेला पाहायला मिळतो. त्यामुळेच आजकाल सर्रास तंग कपड्यातल्या अभिनेत्री पाहायला मिळतात. यांमध्ये आजच्याच काळातील अभिनेत्री आहेत असेही नाही. कारण काही जुन्या अभिनेत्रीदेखील बिनधास्त बोल्ड कपडे घालून मिरवत असतात.

सध्या अभिनेत्री अमीषा पटेल तिच्या आगामी गदर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीला पुन्हा एकदा सकिनाची भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक झाले आहेत. गदर 2 हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाव्यतिरिक्त अमिषा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते देखील थक्क होऊन जातात. अमीषाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)


व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत सकिना फेम अमिषा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. त्यात अभिनेत्री काळ्या रंगाचा टॉप आणि रंगीत पॅण्ट घातली आहे. केस मोकळे सोडून डोळ्यावर काळा गॉगल लावून ती फारच सुंदर दिसत आहे. बाल्कनीत उभी राहुन वेगवेगळ्या पोज मध्ये तिने हा व्हिडिओ बनवून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)


अमिषाचा हा व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले, अशी सकिना असेल तर पाकिस्तानच काय तर अमेरिकाही मागे लागेल. आणखी एकाने आय लव्ह यू अमिषा पटेल असे म्हटले आहे. एकाने म्हटले की, गदर 2 मध्ये तुम्हाला परत पाहण्यासाठी अजून वाट पाहिली जात नाहीय. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तारा सिंह तुमच्या याच अदांचा दिवाना आहे. तु नेहमीच छान दिसते.

काय आहे गरद2 ची कथा – 22 वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंह आणि सकिनाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या मोहोलमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात 1947 मध्ये झालेल्या फाळणीचे दृष्य दाखवले गेले होते. आता 2023 मध्ये सुद्धा या चित्रपटात भारत पाकिस्तानवर आधारित कथा दाखवण्यात येणार आहे.