बॉलीवूड चे सुप्रसिद्ध म्युझिक कंपोजर वाजिद खान यांना रविवार दिनांक ३१ मे रोजी देवाज्ञा झाली. ते फक्त ४२ वर्षांचे होते. संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये साजिद वाजिद यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. वाजिद यांना मागील काही दिवसांपासून किडनीचा त्रास होता. त्यांच्यावर मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा सुरू होते. मात्र अचानक तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले. वाजिद यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर वाजिद यांच्या मृत्यूचे कारण कोरोनाव्हायरस असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वाजिद खान यांचा बालपणीचा मित्र रणवीर शौरी यांनी लिहिले की, मी माझ्या बालपणीच्या मित्रा बद्दलची हि बातमी ऐकून खूप दुखी झालो आहे. वाजिद ने कोविड १९ समोर त्याचे गुडघे टेकवले. मला अक्षरशः सदमा लागला आहे. वाजिद माझ्या भावा मी तुला व तुझ्या परिवाराला कडकडून मिठी पाठवत आहे. ही खरंच खूप दुःखद बातमी आहे.
साजिद वाजिद हे सलमान खानचे सर्वात आवडते म्युझिक कंपोजर होते. या दोघांनी ईद निमित्त सलमान खानचे भाई भाई हे गाणे रिलीज केले. वाजिद ने १९९८ मध्ये आलेल्या प्यार किया तो डरना क्या या सलमान खान च्या चित्रपटातून नाच म्युझिक कंपोजर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वाजिद यांचे शेवटचे गाणे सुद्धा सलमान खान सोबतचेच ठरले.
याव्यतिरिक्त दबंग ३ या चित्रपटातील सर्व गाणी साजिद-वाजिद यांच्या कंपोझिशन मध्येच तयार झाली आहेत.
वाजिद ने सलमान खान साठी सिंगर म्हणून हम का पीनी है, मेरा ही जलवा यांसारखी हिट गाणी सुद्धा गायली. याव्यतिरिक्त सोनी दे नखरे, माशाअल्लाह, डू यु वाना पार्टनर ही गाणी त्यांच्या अनेक हिट गाण्यांपैकी एक आहेत. दबंग या चित्रपटातील म्युझिक साठी त्यांना २०११ च्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
वाजिद यांच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा पाऊस पडत आहे. वाजिद यांचे सर्वात जवळील मित्र आणि सिंगर सलीम मर्चेंटने त्यांच्या आठवणीत श्रद्धांजली दिली. सलीम ने ट्विटरवर लिहिले की साजिद वाजिद फेम वाजिद खान यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो आहे. अल्लाह त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची साठी शक्ती देवो. भावा तू जिथे कुठे जात आहेस तिथे सुरक्षित प्रवास कर. खूपच लवकर निघून गेलास. मी बातमीमुळे संपूर्ण तुटून गेलो आहे.
बॉलीरिपोर्ट टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही आपल्या भावना कमेंट्सद्वारे व्यक्त करू शकता !
साजिद वाजिद यांची जोडी तुटली, वाजिद खान यांचे या कारणामुळे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन !
