बॉलीवूड कलाकारांचे लग्न हे सर्वसामान्य माणसांच्या कुतूहलाचा विषय असतो. त्यांचं अफेअर कोणाशी आहे, ते लग्न कशा पद्धतीने करणार रजिस्टर करणार की धामधुमीत करणार. ते लग्न कोठे करणार या सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या मनात घोंगावत असतात. अशातच या बॉलिवूड स्टार्सच्या लग्नांना लिफाफ्यामध्ये किती रुपये देत असतील हा प्रश्न तर अजाणतेपणे सर्वांनाच पडतो. सर्वसामान्य माणसांच्या लग्नात आपापल्यापरीने जेवढे जमेल तितके पैसे लोक लिफाफ्यात ठेवतात.
लग्न घर हे आपल्या कितीही जवळचे आहे ते आपले किती जवळचे नातलग आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून लिफाफ्यात पैसे ठेवले जातात. मात्र बॉलिवूड स्टार्स लग्नसोहळ्यात लिफाफ्या मध्ये किती पैसे ठेवत असतील हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला याच गोष्टी बद्दल सांगणार आहोत.
बॉलीवूड करांचे लग्न हे मोठ्या थाटामाटात होते. सोशल मीडियावर व्हायरल होणारे बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाचे फोटो पाहून सर्वसामान्य माणसांना देखील असेच लग्न करावे अशी इच्छा निर्माण होते. अशातच या लग्नात लिफाफ्या मध्ये किती पैसे मिळत असतील हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येणे सहाजिकच आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो किती ते किती पैसे ठेवतात. ही रक्कम ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.
बॉलीवूडचे मंडळी कोणत्याही विवाहसोहळ्यात गेल्यावर तेथे शगुन म्हणून १०१ रुपये देतात. झालात ना ही रक्कम वाचून हैराण ! पण हेच सत्य आहे. या गोष्टीचा खुलासा खुद्द अमिताभ बच्चन यांनी केला. अमिताभ यांनी एका शो दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता ची बॉलिवूड स्टार्स कोणत्याही लग्नात जाताना शगुन म्हणून १०१ रुपये ठेवतात. या शोमध्ये बिग बीं सोबत कॉमेडी किंग कपिल शर्मा सुद्धा उपस्थित होता.
कपिल शर्माने मजेत बिग बींना विचारले की फिल्मस्टार जेव्हा कोणताही लग्नात जातात तेव्हा ते लिफाफ्या मध्ये किती रुपये ठेवत असतील. या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी सांगितले की फिल्म इंडस्ट्री मध्ये भेटवस्तू म्हणून शगूनाचे १०१ रुपये दिले जातात. यामागील कारण म्हणजे बॉलीवूड इंडस्ट्री खूप मोठी आहे यामध्ये अनेक लहान मोठे कलाकार असतात. यामध्ये स्पॉट बॉय पासून ते अगदी मोठ्या कलाकारां पर्यंत सर्व मंडळी समाविष्ट असतात. अशातच प्रत्येकाला मोठी रक्कम देणे परवडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तींनी स्वतःला कमी लेखू नये यासाठी फिल्म असोसिएशन मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !