२०२० हे वर्ष बॉलीवूडकरांसाठी काहीसा क्लिष्ट असे ठरले. या वर्षात एकापाठोपाठ एक असे दिग्गज कलाकार आणि गायक हे जग सोडून जात आहेत. सर्वात आधी दिग्गज अभिनेता इरफान खान ने हे जग सोडले त्याच्यापाठोपाठ ऋषी कपूर यांनादेखील देवाज्ञा झाली आणि आता सुप्रसिद्ध म्युझिक कंपोजर साजिद-वाजिद यांची जोडी तुटली कारण या जोडीमधील वाजिद खान यांचे निधन झाले.
रविवारी रात्री ४२ वर्षीय वाजिद खान यांचा देहांत झाला. वाजिद हे एक सुप्रसिद्ध हिंदी म्युझिक कंपोजर आणि सिंगर होते. एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच होते. आज ते ज्या स्थानावर होते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. साजिद-वाजिद यांच्या जोडीने वयाच्या ७/८ व्या वर्षी संगीत शिकण्यास सुरुवात केली होती.
साजिद-वाजिद यांचे वडील उस्ताद शराफत खान हे एक तबला वादक होते.
सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातून या जोडीने बॉलिवूडमध्ये गाणे गाण्यास सुरुवात केली होती. त्यांनी सलमानच्या तुमको ना भुल पायेंगे, मुझसे शादी करोगी, गर्व, तेरे नाम, पार्टनर, गॉड तुसी ग्रेट हो, एक था टायगर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये हिट सॉंग दिले होते. वाजिद यांच्या लक्झरी लाइफ बद्दल बोलायचे झाल्यास ते एकदम डाऊन टू अर्थ माणूस होते. त्यांना या स्थानावर पोहोचण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला होता.
मीडिया रिपोर्टनुसार वाजिद खान यांच्याकडे १०० ते १२५ करोड रुपयांची संपत्ती आहे. असे म्हटले जाते की ते एका गाण्यासाठी २५ ते ५० लाख रुपये फी घ्यायचे. मात्र या मुक्कामी पोहोचण्यासाठी साजिद-वाजिद या जोडीने खूप मेहनत घेतली होती.
हे वाचा – इरफान खान यांनी शेवटच्या मुलाखतीमध्ये बोललेली वाक्य वाचून तुम्ही पण भावुक व्हाल !
वाजिद खान हे मागील दोन-तीन महिन्यांपासूनच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. मात्र मागील दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांच्यामध्ये कोरोना ची लक्षणे दिसून आली होती. पण काही मीडिया रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू कार्डियक अरेस्ट मुळे झाला होता. मिळालेल्या रिपोर्टनुसार मागील तीन-चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले होते. वाजिद यांच्या मृतदेहास वर्सोवा येथील कबरीस्थान मध्ये नेण्यात आले.
याच ठिकाणी दिग्गज अभिनेता इरफान खान ला सुद्धा नेले होते. वाजिद खान यांच्या अंतिम संस्काराला जास्त लोकांना पोहोचता आलेले असे म्हटले जाते की दोन-तीन लोकांना त्यांच्या अंतिमअसे म्हटले जाते की दोन-तीन लोकांना त्यांच्या अंतिम संस्काराला जाण्याची परवानगी मिळाली होती.