Headlines

बॉलिवूड मधील करियर फ्लॉप ठरून सुद्धा हे कलाकार जगत आहेत आयशोआरामाच जीवन !

बॉलिवूडमध्ये असे अनेक सितारे आहेत ज्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी खूप मजबूत आहे. पण या पार्श्वभूमीचा उपयोग त्यांना त्यांचे फ्लॉप करिअर सांभाळण्यासाठी झाला नाही. या कलाकारांनी समजूतदारपणा दाखवून वेळीच चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला आणि कौटुंबिक बिजनेस ला हातभार लावू लागले. आज त्यांचे करिअर फ्लॉप होऊन देखील ते लक्झरी जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच कलाकारांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांच्या करिअरचे आयुर्मान फारच छोटे होते.

सेलिना जेटली –
मिस इंडियाचा किताब जिंकल्यावर सेलीनाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र तिचे करियर फारसे यशस्वी ठरले नाही. २००१ मध्ये सेलिना ने मिस इंडियाचा किताब जिंकला होता. सोबतच तिने मिस युनिव्हर्स या स्पर्धेच्या फायनल पर्यंत सुद्धा मजल मारली होती. त्यानंतर २००३ मध्ये तिने जानशीन मधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सेलीना ने नो एन्ट्री, गोलमाल, टॉम डिक अँड हॅरी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सेलीना ने २०११ मध्ये बिझनेस मॅन पीटर हाग सोबत लग्न केले. पीटर हे एम्मार हॉस्पिटैलिटी ग्रुपचा डायरेक्टर ऑफ मार्केटिंग आहे.
आयेशा टाकिया –
आयेशा चा टारझन द वंडर कार हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट त्यावेळी खूप जास्त हिट ठरला मात्र तिच्या करिअरला हीट ठरता आले नाही. त्यानंतर तिने सलमान खान सोबत वॉन्टेड या चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटामुळे मात्र ती खूप चर्चेत आली होती. आयेशाने लहानपणापासूनच पडद्यावर काम करणे सुरु केले होते. मात्र चित्रपटांमध्ये काम करणे सुरू केल्यापासून तिच्या करिअरला ती गती मिळाली नाही ज्या गतीसाठी सर्व अभिनेत्री तरसत असतात. आयेशा तिच्या निरागसपणासाठी प्रसिद्ध होती. तिने फरहान आजमी सोबत लग्न केले. समाजवादी पार्टीचा नेता अबू आजमी हे आयेशा चे सासरे आहेत. तर तिच्या पतीचा म्हणजेच फरहान चा रेस्टॉरंटचा बिझनेस आहे.
किम शर्मा –
किम शर्मा चे सुद्धा फिल्मी करिअर पाहिजेत असे खास ठरले नाही त्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात ती अपयशी ठरली. २००० मध्ये आलेल्या मोहब्बते या ब्लॉक बस्टर चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. मोहब्बते या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. किमने अली पंजाबी सोबत २०१० मध्ये लग्न केले. मात्र काही कारणास्तव त्यांचे जुळले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. आता ती सिंगल आहे.
नम्रता शिरोडकर –
नम्रता शिरोडकर ने १९९८ मध्ये ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर सहा वर्षांनीच म्हणजेच २००४ मध्ये ‘रोक सको तो रोक लो’ या चित्रपटात तिला शेवटचे पाहिले गेले. या चित्रपटात तिने एका नरेटरची भूमिका केली होती. नम्रताने साऊथ कडील सुपरस्टार महेश बाबुसोबत लग्न करून संसार थाटला. सध्या ती मस्त लक्झरी लाइफस्टाइल जगत आहे.
तुषार कपूर –
‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटातून तुषारने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. तुषार हा अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा असून देखील त्याला त्याच्या वडिलांप्रमाणे स्टारडम मिळवता आले नाही. तुषारला फार कमी चित्रपटात मुख्य अभिनेत्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सतत चित्रपट फ्लॉप झाल्याने आता तुषार कपूर चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *