अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेमासृष्टीत येऊन ५० वर्षे झाली. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा महानायक म्हणून संबोधतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी पासून ते आजतागायत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. शिवाय आज सुद्धा त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. अमिताभ हे मुळचे मुंबईचे नाहीत परंतु चित्रपट सृष्टीत आल्यापासून त्यांनी मुंबईतच आपले घर बनवले आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडे मुंबई एकाहून एक सरस अशी लक्झरी घरे आहेत. यातीलच एक घर म्हणजे जलसा ! चला तर आज आम्ही तुम्हाला जलसा चे आतील फोटो दाखवणार आहोत.
अमिताभ त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत जलसा मध्ये राहतात. त्यांचे फॅन्स त्यांना दर रविवारी तेथेच भेटण्यास येतात. हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या लिविंग रूम चा आहे या फोटोमध्ये तुम्हाला शानदार सोफा वेगवेगळ्या प्रकारचे छोटी छोटी झाडे आणि सुंदर इंटेरियर बघण्यास मिळेल.
हा जलसा मधली एका बेडरूमचा फोटो आहे. या फोटोमध्ये सुद्धा खूप इंटिरियर नजरेस पडते. सोबतच रूमच्या लायटिंग साठी सुद्धा खूप काम केले आहे. ही लाइटिंग बेडरूमला अजूनच सुंदर बनवते. अमिताभ यांचे जलसा हे घर नेहमीच लोकांचा आकर्षणाचा बिंदू ठरतो. त्यांचा जलसा बंगला मुंबईतील जुहू येथे आहे.
हा आहे बंगल्यातील हॉल मधला फोटो. हॉलमधील भिंतींवर शानदार चित्र रेखाटली गेली आहेत. या फोटोंमधून बिग बी यांच्या घराची भव्यता दृष्टीस पडते. जलसा मध्ये अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, आणि सून ऐश्वर्या राय बच्चन व नात आराध्या सोबत राहतात.
अमिताभ बच्चन यांच्या घराच्या फोटोमधील हा कोपरा कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहिला असेल. ही भिंत फोटोफ्रेम्सनी भरलेली आहे. या भिंतीवर अमिताभ बच्चन यांच्या आई-वडिलांपासून ते त्यांच्या जीवनात घडलेल्या अमूल्य घटनांचे काही क्षण कैद करून फोटो फ्रेम स्वरूपी या भिंतीवर लावले आले. या बंगल्यातील प्रत्येक रूमला वेगवेगळ्या थीम नुसार सजवले आहे. ड्रॉइंग रूमपासून ते लीविंग एरिया पर्यंत सर्वच खोल्यांची सजावट उत्कृष्ट आहे.
खालील फोटोमध्ये तुम्ही एक मंदिर बघू शकता. अमिताभ दिवाळीच्या दिवसात येते पूजा करतात त्या वेळचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा वायरल सुद्धा झाले आहेत.
७० च्या दशकाच्या शेवटी अमिताभ प्रतिक्षा या बंगल्यात शिफ्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी जलसा खरेदी केला. अमिताभ बच्चन यांच्या घरात एक मोठे गार्डन सुद्धा आहे. याव्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या घरातील भिंतींना वेगवेगळ्या थीम नुसार रंगवले आहे. तसे पाहायला गेले तर अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या परिवारासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बच्चन परिवाराकडे मुंबईतील जुहू या भागात जलसा, प्रतीक्षा आणि जनक हे तीन बंगले आहेत. हे तिन्ही बंगले एकमेकांपासून काही अंतरावर आहेत.
हा जलसा च्या बाहेरील फोटो आहे. येथे रविवारी अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सची गर्दी पाहण्यास मिळते. मात्र हल्ली कोरोना व्हायरस मुळे अमिताभ बच्चन त्यांच्या फॅन्स ना भेटू शकत नाहीत .
अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला कसा आहे पहा, फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल !
