Headlines

संजय दत्तच्या घरी दर महिना १५०० रुपयांवर काम करायचा हा बॉलीवूड स्टार, नाव वाचून तुम्ही थक्क व्हाल !

बॉलीवुड सारख्या चमचमत्या दुनियेचे सर्वांनाच खूप आकर्षण असते. येथील प्रत्येक व्यक्तीची श्रीमंती, राहणीमान, हौस-मौज या सर्वच गोष्टी एका मोठ्या अंदाजात असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत जे त्यांच्या मेहनत आणि कष्टाच्या बळावर बॉलीवूड मध्ये स्वतः नाव कमावू शकले. आज संपूर्ण दुनियेत या बॉलिवूड कलाकारांचे अनेक फॅन्स आहेत.

या बॉलिवूड स्टार च्या जीवनाबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडते. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील एका अशा स्टार बद्दल सांगणार आहोत जो त्याच्या सुरुवातीच्या दिवसात संजय दत्तच्या घरी महिना १५०० रुपये पगारावर काम करत होता.

आम्ही ज्या स्टार अभिनेत्या बद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणी नसून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर आहेत. शक्ती कपूर यांनी १९७२ मध्ये आलेल्या ‘जानवर और इन्सान’ या चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी ओळख कुर्बानी या चित्रपटाने मिळवून दिली.

यानंतर मात्र शक्ती कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. कुर्बानी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आज सुद्धा प्रेक्षक त्यांनी साकारलेले खलनायक आणि विनोदी ढंगाच्या भूमिका खूप पसंत करतात.
खरेतर शक्ती कपूर यांना सुरुवातीला बॉलिवूडमध्ये यायचे नव्हते. एका इंटरव्यू मध्ये शक्ती कपूर यांनी सांगितले होते की बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी त्यांना भारतीय क्रिकेट टीमचा हिस्सा बनण्याची इच्छा होती. मात्र नशिबाने त्यांना अभिनेता बनवले. त्यांनी सांगितले की जेव्हा ते बॉलिवूडमध्ये आले तेव्हा त्यांचे नाव सुनील होते.

तसेच सुरुवातीला या इंडस्ट्रीमध्ये ते नवखे असल्यामुळे त्यांना जास्त चित्रपट सुद्धा मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना त्याकाळी अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. माझ्या अशा परिस्थितीत त्यावेळी संजय दत्तचे वडील, सुनील दत्त यांनी मला आसरा दिला.

ते मला दर महिना १५०० रुपये द्यायचे ज्यावर मी माझा खर्च भागवायचो. त्यानंतर शक्ती कपूर यांचा एक ए*क्सी*डें*ट झाला होता त्यावेळी त्यांची मुलाखत फिरोज खान यांच्यासोबत झाली आणि त्यांना कुर्बानी चित्रपट मिळाला. त्यानंतर मात्र शक्ती कपूर यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आज सुद्धा शक्ती कपूर यांच्या खलनायकाच्या भूमिका खूप प्रसिद्ध आहेत. आज त्यांना बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. तर त्यांची मुलगी श्रद्धा कपूर सुद्धा सध्या बॉलिवूडची टॉप ची अभिनेत्री आहे.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.