Headlines

अशाप्रकारे सलमान खानला मिळाले ‘सल्लू’ हे नाव, या व्यक्तीने केली होती सुरुवात !

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खानला बॉलिवूडमध्ये दबंग, सल्लू किंवा भाईजान म्हणून त्याचे फॅन्स हाक मारतात. सोशल मीडियावर सुद्धा सलमान खान याच नावाने ट्रैंड होत असतो. पण तूम्हाला माहित आहे का सलमान खानला सल्लू हे नाव कोणी दिले?
सलमान खान ने बॉलीवूड मध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. त्यातीलच एक दिग्गज कलाकार म्हणजे जॅकी श्रॉफ. सलमान खानला सल्लू हे नाव अभिनेता जॅकी श्रॉफ ने दिले होते. यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मधून मिळाली. शिवाय खुद्द सलमान खानने सुद्धा ही बातमी खरी असल्याचे म्हणत सल्लू हे नाव अभिनेता जॅकी श्रॉफ ने त्याला दिले असे त्याने सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन पार्ट आहेत. ज्यात सलमान खान सांगतो की सल्लू हे नाव त्याला जॅकी श्रॉफ ने दिले आहे. व्हिडिओच्या सुरवातीला सलमान खान जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त सोबत दिसतो. त्यानंतर सलमान खान जॅकी श्रॉफकडे इशारा करत म्हणाला की सुरुवातीला हे मला सलमान म्हणायचे त्यानंतर हळूहळू सल्लू बोलायला लागले आणि कधीकधी तर अजून एका नावाने हाक मारायचे त्या नावाबद्दल मी आता काहीच बोलणार नाही.

तर व्हिडिओच्या दुस-या पार्ट मध्ये सलमान खान मिडिया आणि त्याच्या फॅन्सला बोलताना म्हणतो की माझे नाव सलमान खान आहे आणि सलमान खान हे नाव मला खूप आवडते कारण ते मला माझ्या आईवडिलांनी दिले आहे. सल्लू हे नाव तर मला जॅकी ने दिले. त्यानंतर अचानक एक दिवशी त्याने मला सल्ले म्हणून हाक मारली.
सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या नावाशी निगडित हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सलमान खानच्या अनेक फॅन्सनी तसेच अनेक सोशल मिडीया युजर्सनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खान आणि जॅकी श्रॉफने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्या आहेत. सर्वात शेवटी हे दोघे भारतीय चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते.