Headlines

एक महिन्यापासून घराबाहेर न पडता सुद्धा कसा झाला अमिताभ बच्चन यांना कोरोना, जाणून घ्या ! 

संपूर्ण जगभर संक्रमणाची लाट उसळली आहे. गेले तीन महिने सतत टीव्ही वर कोरोना संक्रमित रोगांबद्दल बातम्या दाखवल्या जातात. लोकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. एवढी काळजी घेऊन सुद्धा कोरोना मात्र लोकांची पाठ सोडत नसल्याचे चिन्ह दिसत आहे. नुकताच कोरोना ने बॉलीवूडच्या बच्चन परिवारात शिरकाव केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
याबाबतची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन ने सुद्धा तो स्वतः व त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विट करत सांगितले. सध्या या दोघांना मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये भरती केली आहे. नानावटी हॉस्पिटल च्या पीआरओ ने सांगितले की अमिताभ बच्चन यांच्या मध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे.
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे व घरात राहणाऱ्या स्टाफ चे सॅम्पल चेकिंग साठी घेतले आहेत. यामध्ये जया बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन व आराध्या बच्चन यांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले पण त्यांना अजून काहीही लक्षणे नाहीत. घरातील स्टाफचा रिपोर्ट अजून आलेला नाही. प्रशासन सध्या गेल्या दहा दिवसात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान बच्चन परिवाराशी संबंधित असलेल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे समजले की, अभिषेक बच्चन घराबाहेर पडल्यामुळे कोरोना बच्चन परिवारात दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन त्याच्या वेब सिरीज च्या डबिंग साठी साउंड अँड डबिंग स्टुडिओमध्ये जात होता. पण लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बिग बी अमिताभ बच्चन घराबाहेर पडलेले नाहीत.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर डबिंग स्टुडिओ ‘साऊंड अंड डबिंग स्टुडिओ’ आहे त्या स्थितीत बंद करण्यात आला. गेले काही दिवस अभिषेक बच्चन याच स्टुडिओमध्ये त्याची वेब सिरीज ब्रेथ :इन टू द शॅडोच्या डबिंग साठी जात होता. याबाबतची माहिती ट्रेड ॲनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करून दिली. त्यांनी ट्विट केले की, साऊंड अॅण्ड विजन डबिंग स्टुडिओ सध्या आहे त्या स्थितीत बंद केला आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन तेथे ब्रेथ :इन टू द शॅडो या वेब सिरीजची डबिंग करत होता.
दरम्यान बीएमसी ने अमिताभ बच्चन यांचा जनक हा बंगला सील केला आहे. या बंगल्यात अमिताभ बच्चन यांचे ऑफिस आहे. तर त्यांचा संपूर्ण परिवार जुहू येथील जलसा बंगल्यात राहतो. रविवारी जलसा बंगला सुद्धा सॅनिटाईझ करून कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित केला आहे.