Headlines

अखेर बाकी देशांना मागे टाकत रशियाने काढली कोरोनावर पहिली लस, मानवी चाचणीही यशस्वी !

जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरस ने सर्व जणांना हैराण करून टाकले आहे. संपूर्ण जग या कोरोनाव्हायरस ने बंदिस्त करून टाकले त्यामुळे यातून मुक्तता कधी होईल याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत. दरम्यान रशियाच्या सेचेनोव विश्वविद्यालयाने जगातील पहिली कोरोना व्हॅक्सिन तयार झाल्याचा दावा केला आहे. विश्वविद्यालयाचे म्हणणे आहे की या व्हॅक्सिनच्या सर्व चाचण्यांचे यशस्वी निरीक्षण झाले आहे.
रशियाचा हा दावा खरा ठरला तर ही व्हॅक्सिन कोरोनाव्हायरस वरील पहिली व्हॅक्सिन ठरेल. व व्हॅक्सिनमुळे कोरोना सारख्या महामारी च्या संकटातून बाहेर पडण्यास मार्ग सापडेल. तर दुसरीकडे अमेरिकेसोबत जगातील इतर विकसित राष्ट्र सुद्धा कोरोनाव्हायरस वर व्हॅक्सिन तयार करण्याचे प्रयत्न करत आहेत. यातील काही चाचण्या ट्रायल च्या वेळी असफल ठरतात मात्र रशियाची ही पहिली व्हॅक्सिन आहे जिने सफलतेत बाजी मारली.
इंस्टीट्यूट फॉर ट्रांसलेशनल मेडिसिन एंड बायोटेक्नोलॉजी चे डायरेक्टर वदिम तारासोव यांनी सांगितले की विश्वविद्यालयाने १८ जून ला रशियाच्या गेमली इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीने बनवलेल्या व्हॅक्सिनचे परीक्षण करण्यास सुरुवात केली होती. सेचेनोव विश्वविद्यालयाने आता कोरोनाव्हायरसच्या जगातील पहिली व्हॅक्सिनची स्वयम् सेवकांवर यशस्वीरित्या चाचणी केली आहे.‌
सेचनोव यूनिवर्सिटी मध्ये इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल पैरासिटोलॉजी, ट्रॉपिकल एंड वेक्टर-बॉर्न डिजीजचे दिग्दर्शक अलेक्जेंडर लुकाशेव यांच्या मते या संपूर्ण अध्ययनाचे ध्येय मानव स्वास्थ्याच्या रक्षणासाठी कोविड १९ वर लस तयार करणे हे होते. सुरक्षेच्यादृष्टीने या व्हॅक्सिनचे सर्व मानवी परीक्षण केले गेले आहे त्यामुळे लोकांच्या सुरक्षेसाठी ही व्हॅक्सिन लवकरच बाजारात उपलब्ध होईल.

तारसोवने सांगितले की, सेचेनोव विश्वविद्यालय हे केवळ शैक्षणिक संस्थान नसून वैज्ञानिक आणि तांत्रिकी अनुसंधान केंद्र म्हणून सुद्धा कार्य करते. महामारी सारख्या स्थितीमध्ये ड्रग्स सारखे महत्त्वपूर्ण आणि जटील उत्पादन निर्माण करण्यास ही संस्था खूप सक्षम आहे. या संस्थेने कोरोना लसी सोबत काम करण्यास सुरूवात केली असून या व्हॅक्सिन ट्रायलच्या दुसऱ्या समूहाच्या स्वयंसेवकांना २० जुलैला सोडण्यात येईल.
दुसरीकडे एका अमेरिकन कंपनी मॉडर्नाने दावा केला की ते लवकरच कोरोनाची व्हॅक्सिन तयार करतील. त्यांचे असे म्हणणे आहे की या व्हॅक्सिन मुळे कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात कोरोना चे संक्रमण होऊ शकत नाही. १८ मे ला मॉडर्नाने घोषणा केली होती की फेज-१ ट्रायल मध्ये त्यांनी तयार केलेल्या व्हॅक्सिनचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

mRNA-1273 व्हॅक्सिनला अमेरिकेच्या नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ आणि मॉडर्ना कंपनी ने बनवले. मॉडर्नाने हे सुद्धा सांगितले होते की जुलै महिन्यात या व्हॅक्सिनच्या फेज ३ च्या अभ्यासास प्रारंभ होईल. या तिसऱ्या फेरीत ३० हजार लोकांवर या व्हॅक्सिनचे परीक्षण करण्याची योजना आखली आहे.