Headlines

अख्या मार्केटचा बाप आला, अवघ्या २३ वर्षाच्या मुलाने कमावले १०० कोटी, जाणून घ्या !

शेअर मार्केट हे पैसे कमावण्याचे आजकालचे नवे साधन झाले आहे. पण यामध्ये जोखीमही तितकीच असते. यात कधी आपला पैसा दुप्पट होतो तर कधी आपण पूर्णपणे डबघाईला येतो. शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करणे म्हणजे नशीब आजमावणे त्यासाठी तुमच्यात संयम असणे देखील महत्वाचे आहे. शेअर मार्केट मध्ये नफा झालेल्या व्यक्तींमध्ये वॉरन बफे,राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांसारखी उदाहरणे ऐकायला मिळतात.

आता त्यात आणखी एक नाव सहभागी झाले आहे ते म्हणजे संकर्ष चंदा. तो केवळ २३ वर्षांचा आहे. ज्या वयात मुलं ऐन तारुण्यात आल्यामुळे मजा मस्ती धमाल करण्याच्या मुड मध्ये असतात तिथं या पट्ठ्याने मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. संकर्ष १०० कोटींचा मालक आहे. सध्या त्याने Svobodha Infinity Investment Advisors Private Limited नावाची एक स्टार्टअप कंपनी सुरु केली आहे.

संकर्ष बेनेट युनिव्हर्सिटीमधून B.Tech कॉम्प्युटर सायन्सच्या पदवीचा अभ्यास करत होता. पण त्याला शेअर मार्केटची आवड होती. त्यामुळे त्याने ते शिक्षण अर्धवट सोडले. १२ वी झाल्यावर त्याने त्याचे पुर्ण लक्ष शेअर मार्केटमध्येच वळवण्याचे ठरवले. आता १०० कोटींचा मालक असलेल्या संकर्षने सुरुवातीला केवळ २००० रुपये गुंतवले होते. पुढे त्याने भरपूर कमाई केली. पुढच्या दोन वर्षात त्याने १.५ लाख रुपये गुंतवले.

शिक्षण अर्धवट सोडुन संकर्षने २०१७ मध्ये ३५ लोकांसह ही कंपनी सुरु केली होती. त्यावेळी त्याने ८ लाख रुपये गुंतवले होते. स्वताचे अनुभव लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्याने आर्थिक निवाण हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातून त्याने ट्रेडिंग आणि गुंतवणूक यातील फरक स्पष्ट केला आहे. १०० कोटींचा मालक असूनही संकर्ष अगदी साध्या राहणीमानात वावरतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !