Headlines

जर तुम्हाला एका दिवसासाठी पंतप्रधान बनवले तर तुमचा सर्वात पहिला निर्णय कोणता असेल ? IAS परीक्षेत विचारलेला प्रश्न !

सध्या सर्वत्र जगभर कोरोनाने हाहाकार माजवला असताना मुलांचे शैक्षणिक भवितव्य तळ्यात मळ्यात चालु आहे. राज्यात दहावीची परीक्षा जरी रद्द केली असली तरी बारावीच्या परीक्षांबाबत निकाल येणे बाकी आहे. तर देशातील उच्च स्थरीय परीक्षा मानली जाणारी युपीएससी सिविल सेवा प्रिलिम्सची परीक्षा २७ जुनला होणार असल्याचे बोलले जात आहे. तर सप्टेंबर मध्ये त्याची मेन्स परीक्षा होणार आहे. त्यानंतर यातील निवडक लोकांचा इंटरव्ह्यु घेतला जाईल.

मागील काही दिवसांत या परीक्षेसंबधी खुप गदारोळ माजला होता. या परीक्षेचा इंटरव्ह्यु खुप कठीण असतो. त्यामुळे या परीक्षेची पुर्वतयारी म्हणुन आम्ही तुमची मॉकटेस्ट घेणार आहोत. या मॉकटेस्टमध्ये आम्ही तुम्हाला असे काही प्रश्नउत्तर देणार आहोत जे परीक्षेच्या तयारी साठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

१. सर्व प्रथम कोरोना व्हायरस कोणत्या डॉक्टरांनी तपासला ? – चीनच्या वुहान येथील सेंट्रल हॉस्पिटलमधील डॉळ्यांचे डॉक्टर वेनलिया्ंग यांनी सर्वप्रथम या व्हायरसचा शोध लावला. वेनलिया्ंग यांनीच जगाला या व्हायरसबद्दल सर्वप्रथम सांगितले होते. विषेश म्हणजे जगासमोर महाभयंकर अशा कोरोनाचे सत्य आणणाऱ्या या डॉक्टरचा दुर्दैवी अंत कोरोनामुळेच झाला होता. त्यावेळी त्यांचे वय केवळ ३४ वर्षे होते. चीनी लोकांसाठी वेनलिया्ंग हे खऱ्या अर्थाने हिरो होते.

२. अशी कोणती रुम आहे जिला दरवाजे खिडक्या काहीच नाही ? आता हा प्रश्न वाचल्यावर अनेकांच्या मनात बाथरुम हे उत्तर आले असेल पण असे नाही कारण बाथरुमला सुद्धा दरवाजे खिडक्या असतात. त्यामुळे या प्रश्नाचे खरे उत्तर मशरुम असे आहे.

३. पेट्रोलला हिंदीमध्ये काय म्हणतात ? -सध्या राज्यात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ते कमी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या ला हिंदीत काय म्हणत असतील याकडे फारसे कोणाचे लक्ष जात नाही. पण असे प्रश्न सुद्धा काही वेळेस तुमच्या एका एका पॉइंटसाठी भारी पडु शकतात. तर या प्रश्नाचे खरे उत्तर आहे शीलातौल किंवा ध्रुव स्वर्ण.

४. लीडर आणि मॅनेजरमध्ये काय फरक असतो ? हा प्रश्न सुरज कुमार रायला विचारला गेला होता, त्यावेळी त्याने Leader does the right thing, and Manager does the thing rightly असे उत्तर दिले. याचाच अर्थ लीडर योग्य काम करतो. तर मॅनेजर कामांना योग्यप्रकारे करतो. सुरज कुमार यांना त्यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यावेळी त्यांने सांगितले कि तसे पाहायला गेले तर दोघांची काम एकमेकांशी खुप मिळतीजुळती आहेत. लीडर हा दिशादर्शक असतो. एक मार्गदर्शक म्हणुन तो आपले काम पार पाडत असतो. इतरांना काम करण्यासाठी प्रेरीत करणे हे त्याचे मुख्य काम असते. तर मॅनेजरचे काम थोडे खोलात जाणारे असते. मॅनेजर काही वेळेस छोटी कामे सुद्धा करतो तर काही वेळेस योजना सुद्धा आखतो. त्यावेळी तुला मॅनेजर बनायला आवडेल कि लीडर असे सुरजला विचारले असता त्याने अॅडमिनिस्ट्रेटर असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने त्याचे आईएएससाठी सिलेक्शन झाले.

५. पृथ्वी आपल्या कक्षेत गोल फिरते तर मग आपण का नाही फिरत ? पृथ्वी ठराविक गतिने तिच्या कक्षेत फिरत असते. त्यामुळे पृथ्वीसोबत आपण देखील फिरत असतो. पण ते फिरणे आपल्याला जाणवत नाही. पण जर पृथ्वीने फिरणे थांबवले तर आपल्याला पृथ्वीची गति नक्कीच जाणवेल. खरेतर पृथ्वी ही फायटर प्लेनच्या तुलनेत दुप्पट वेगात फिरत असते. (1600kph) ही पृथ्वीची गति असते. पृथ्वी तिच्या कक्षेत फिरत असताना आपण देखील तिच्या सोबत फिरत असतो त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही.

६. जर तुम्हाला एका दिवसासाठी पंतप्रधान बनवले तर तुमचा सर्वात पहिला निर्णय कोणता असेल ? 
आयएएसच्या इंटरव्ह्युमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर कॅंडीडेटने उत्तर दिले कि आपल्या देशात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारी. त्यामुळे मी सर्वप्रथम बेरोजगारांसाठी नोकऱ्यांची व्यवस्था करेन. देशात असे अनेक तरुण आहेत जे उच्चशिक्षित असुन देखील बेरोजगार आहेत. दुसरे म्हणजे मी वेगवेगळ्या स्कॉलरशिपमधुन शिक्षणाचा अधिकार वाढवेन. मुलींना शाळेत जाता यावे यासाठी मी प्रयत्न करीन.

७. पैसे कमावण्यासाठी तुम्हाला सिव्हील सर्व्हिस करायची आहे का ? सिविल सर्व्हिस हे एक उत्तम करियर आहे. येथे तुम्हाला थेट सोशल सर्व्हिस करण्याची संधी मिळते. त्यामुळे पैशांपेक्षा जास्त मला लोकांची सेवा करायला त्यांची मदत करायला जास्त आवडेल.

८. हेलिकॉप्टरचा अविष्कार कोणी केला होता ? १९४० मध्ये लियोनार्डो द विंची समवेत इतर अन्य लोकांनी हेलिकॉप्टर बनवण्याचे काम सुरु केले होते. मात्र हेलिकॉप्टरचा खरा अविष्कार हा Igor Sikorsky आणि Paul Cornu यांनी केला होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !