Headlines

रात्री झोपताना करा फक्त हा एक घरगुती उपाय, सावळा चेहरा होईल गोरा आणि सुंदर तजेलदार !

प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर, मोहक दिसावं आणि यासाठी वेगवेगळे व महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरले जातात. मुलगी असो व मुलगा प्रत्येक जण आपण सुंदर व गोरे कसे दिसू हे पाहत असतात. जाहिराती पाहून विविध ब्युटी प्रॉडक्ट्स वापरले जातात.

पण काही प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाच्या त्वचेला एखादे ब्युटी प्रॉडक्ट सूट होत नाही आणि मग ऍलर्जी होते, कारण हे सर्व प्रॉडक्ट्स मुख्यत्वे केमिकल प्रोसेस करून तयार केले जातात, ज्यामुळे चेहऱ्याला याचा त्रास होतो. म्हणूनच असे काही घरगुती व सोपे उपाय आहेत ज्यांचा वापर करून आपण नैसर्गिकरित्या सुंदर व गोरी त्वचा मिळवू शकतो.

कोरफड – कोरफड ही एक औषधी वनस्पती असून तिचा उपयोग अनेक गोष्टींसाठी केला जातो. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला व त्वचेला पोषक घटकांचा पुरवठा होतो.

कोरफड आपले र*क्त आतून शुद्ध करते व त्यामुळे त्वचा उजळते. आपल्या चेहऱ्यावर काही डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते. कोरफड आपण खाऊ देखील शकतो आणि त्याचा आतील गर काढून चेहऱ्याला देखील लावू शकतो. कोरफडपासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनवले जाते.

चेहऱ्यावर जर पिंपल्स आले असतील तर कोरफडमध्ये कडुनिंब व लिंबाचा रस मिक्स करून फेस पॅक तयार करा आणि हा फेस पॅक रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावावा आणि १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. या फेसपॅकमुळे जर तुमच्या चेहऱ्यावर जळजळ जाणवत असेल तर आपण हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू नये.

फक्त कोरफड चेहऱ्याला लावावी आणि थोड्या वेळाने चेहरा गरम पाण्याने धुवावा आणि चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला नारळाचे तेल लावावे. कोरफडमध्ये गुलाबपाणी मिक्स करून रात्रीच्या वेळेत ते चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे हळू हळू आपला चेहरा उजळू लागेल व सुंदर दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.