Headlines

आंबा किंवा आमरस खाल्यावर लगेच या गोष्टींचे सेवन कधीच करु नये, भोगावे लागतील हे दुष्परिणाम, जाणून घ्या त्या गोष्टी !

नुसतं आंबा हे नावं उच्चाराच तोंडाला पाणी सुटते. आंबा हे असे फळ आहे जे अगदी कच्चे असल्यापासुन ते पुर्ण पिकल्यावर पण आवडीने खाल्ले जाते. त्यामुळेच कदाचित आंब्याला फळांचा राजा म्हटले जात असावे. लहानमुलांपासुन ते अगदी अबाल वृद्धांपर्यंत सर्वच जण आंब्याचे चाहाते असतात. आंबा खाल्यामुळे अनेक रोगांचा नाश होतो. तसेच त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. आंबा खाणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात कधीच र*क्ता*ची कमी भासत नाही. आंब्याचे नियमित सेवन केल्यास पाचन क्रियेवर सुद्धा त्याचा फरक जाणवतो. तसेच पोटासंबधी आजार नाहीसे होतात.

आंब्यामध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विटामिन ए चे प्रमाण भरपुर असते. तसेच त्वचे साठी सुद्धा आंबा उत्तम असतो. मात्र आंबा खाताना काही गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार. त्याचे जास्तीही सेवन करु नये. आंबा जास्त प्रमाणात खाल्यास मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता असते. तर काही अशा गोष्टी आहेत ज्या आंबा खाल्यावर चुकुनही खाऊ नये. ते खाल्यास शरीराला त्याचे घातक परिणाम भागावे लागु शकतात.

१. पाणी – आंबा खाल्यावर कधीही चुकनही पाणी पिऊ नका. आंबा खाल्यावर पाणी प्यायल्यास पोट दुखी, गॅस, आणि अॅसिडची समस्या होऊ शकते. या व्यतिरिक्त आतड्यामध्ये इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते. आंबा खाल्यावर जर खुप तहान लागली असेल तर कमीत कमी अर्धा तासाने पाणी प्या.

२. कोल्ड ड्रिंक्स – आंबा खाल्यावर लगेच कोल्ड ड्रिंक किंवा कोणता ही ज्युस पिऊ नये. कारण त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढु शकते. त्यामुळे डायबेटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकुनही आंबा खाल्यावर कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका.

३. दही – आंबा खाल्यावर कमीतकमी एका तासाने दही खावे. आंबा खाल्यावर लगेच दही खाल्यास शरीरात कार्बन डाय ऑक्साइड मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतो. त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते.

4. कारले – आंब्याचे सेवन केल्यावर कधीच कारले खाऊ नये. आंबा खाल्यावर लगेच कारले खाल्यास मळमळने, उलटी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

५. मसाल्याचे पदार्थ – आंबा खाल्यावर लगेच कधीच तिखट मिर्चीचे किंवा मसाल्याचे पदार्थ खाऊ नये. आंबा खाल्यावर मसालेदार पदार्थ खाल्यास पोट आणि त्वचेसंबंधी आजार होई शकतात.

६. साखर – आंबा हा आधीच चवीला खुप गोड असतो. त्यात साखरेचे प्रमाण खुप असते. त्यात जर आपण आंबा खाल्यावर साखर खाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. काही वेळेस ह्रदयासंबंधी सुद्धा आ्जार तयार होतात.
त्यामुळे मंडळी वर सांगितलेल्या कोणत्याही पदार्थांचे सेवन आंबा खाल्ल्यानंतर करु नये. आंबा खाल्यावर गरम दुध पिणे उत्तम असते. साखर न घातलेले गरम दुध जर तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर प्यायलात तर तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण कधीच कमी होत नाही. तसेच त्वचा सुद्धा तजेलदार होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.