Headlines

‘धर्म योद्धा गरूड’ १४ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता !

गेली दोन वर्षे कोरोनामुळे लॉकडॉउनच्या विळख्यात अडकलेले जग आता हळुहळु बाहेर प़डु लागले आहे. या विळख्यातुन टिव्ही इंडस्ट्रीसुद्धा सावरत असुन, टिव्हीवर देखील नवनवीन मालिका सुरु होऊ लागल्या आहेत. कोरोनाच्या काळात सर्व शुटींग ठप्प झाल्यामुळे रामायण महाभारत सारख्या पौराणिक मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यामुळे प्रेक्षकांचा कल पुन्हा एकदा पौराणिक मालिकांकडे वळला आहे.

पुराणतील लोकांना माहित नसलेल्या गोष्टींचा उलगडा या मालिकांमधुन केला जातो. अशीच एक नवी कोरी व कोणाला फारशी माहित नसलेली कथा सोनी सब वाहिनी ‘धर्म योद्धा गरूड’ या मालिकेद्वारे घेऊन येत आहे. १४ मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका प्रक्षेपित होईल.

या मालिकेत डीआयडी लिटील मास्टर सीजन २ चा विजेता फैजल खान ‘धर्म योद्धा गरूड’ची भुमिका साकारणार आहे, तर त्याच्यासोबत अंकित राज, पारूल चौहान, तोरल रासपुत्र, ऋषिकेश पांडे, विशाल करवाल, अमित भानुशाली यांची देखील महत्वपुर्ण भुमिका पाहायला मिळतील. आई-मुलाच्‍या नात्‍यामधील अद्वितीय पैलू आणि त्यांच्यात येणाऱ्या अडचणी, गुलामगिरीमध्‍ये जन्‍म घेतल्‍यामुळे गरूड त्‍याच्‍या आईच्‍या दुर्दशेचे कारण शोधण्‍याचा प्रयत्‍न करतो.

सर्व विषमतांवर मात करत तो लढण्‍याचे धाडस दाखवतो आणि त्‍याच्‍या आईला गुलामगिरीमधून बाहेर काढण्‍याचा प्रयत्‍न करतो. पण प्रत्‍येकवेळी त्याची आई विन्‍ता त्‍याला थांबवते. विन्‍ता गरूडापासून कोणते रहस्‍यमय गुपित लपवत आहे? गरूडची आई विन्‍ताप्रती एकनिष्‍ठता आणि या विश्‍वामध्‍ये त्‍याच्‍या कर्तव्‍याप्रती स‍मर्पितता त्‍याला ‘धर्म योद्धा गरूड’ कसे बनवते हे या मालिकेत रंजकरित्या दाखवण्यात येणार आहे.

अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व व्‍हीएफएक्‍सचा समावेश असलेली मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ रिअल-टाइम व्‍हर्च्‍युअल प्रॉडक्‍शन टेक्निक – अल्टिमेटचा वापर करत निर्माण करण्‍यात आली आहे. पहिल्‍यांदाच भारतीय टेलिव्हिजनवर अल्टिमेटचा वापर करण्‍यात आला आहे. इल्‍यूजन रिअॅलिटी स्‍टुडिओजने मालिकेसाठी अद्भुत व्‍हीएफएक्‍सवर काम केले आहे. ही मालिका सोनी सबचे अभूतपूर्व कथानक सादर करण्‍याचा भव्‍य प्रयत्‍न आहे. ही टेक्नोलजी भारतात आणण्यासाठी ८ महिन्याचा कालावधी लागल्याचे निर्माता अभिमन्यु सिंग यांनी सांगितले. भारतीय प्रेक्षकांना पहिल्‍यांदाच टेलिव्हिजनवर काही भव्‍य व्‍हर्च्‍युअल प्रॉडक्‍शन टे‍क्निक्‍स, व्‍हीएफएक्‍स व हाय-टेक ग्राफिक्‍सचे पुरस्‍कार-प्राप्‍त संयोजन पाहायला मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !