महिला दिनाच्या निमित्ताने पत्नीच्या नावाने बँकेत किंवा पोस्टात खोला हे स्पेशल खाते, मिळतील महिन्याला ४४७९३ रुपये !

bollyreport
3 Min Read

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. या खास दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला एक खास गिफ्ट देऊन आत्म निर्भर बनवु शकता. तुम्ही घरी नसताना तुमच्या घरी एक नियमित रक्कम यावी तसेच भविष्यात तुमच्या पत्नीला पैशांसाठी कोणावर अवलंबुन राहावे लागु नय़े यासाठी यासाठी तुम्हाला National Pension Scheme मध्ये गुंतवणुक करण्याची संधी आहे.

पत्नीच्या नावाने न्यू पेंशन सिस्टममध्ये खाते उघडा – तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे न्यू पेंशन सिस्टममध्ये खाते उघडु शकता. या स्किममध्ये तुमच्या पत्नीला ६० वर्षे पुर्ण झाल्यावर एकत्र रक्कम मिळते. तसेच त्यांना पेंशन म्हणुन सुद्धा रेग्युलर रक्कम मिळत राहते. तसेच यात तुमच्या पत्नीला दर महिना किती रक्कम मिळावी हे देखील तुम्ही ठरवु शकता. यामुळे तुमची पत्नी वयाच्या साठीत पैशांसाठी कोणावर निर्भर राहणार नाही. चला तर या स्किम बाबत सविस्तर जाणुन घेऊ.

गुंतवणुक करणे आहे सोपे – या स्किम अंतर्गत तुम्ही दर महिना किंवा वर्षाला या स्किम मध्ये पैसे जमा करु शकता. इथे केवळ १ हजार रुपयांत पण तुमच्या पत्नीच्या नावे खाते उघडले जाऊ शकते. वयाच्या ६० व्या वर्षी हे खाते मॅच्युर होते. शिवाय तुम्हाला हवे असल्यास मॅच्युरिटी चा कालावधी तुम्ही ६५ वर्षे वाढवु शकता.

४५ हजारापर्य़ंत मासिक इन्कम – जर तुमच्या पत्नीचे वय ३० असेल आणि तुम्ही त्यांच्या खात्यात जर ५००० रुपयाची गुंतवणुक करत असाल तर आणि त्यावर तुम्हाला वार्षिक १० टक्के रिटर्न मिळत असले तर ६० व्या वर्षी अकाउंट मध्ये एकुण १.१२ करोड रुपये असतील. त्यातील त्यांना ४५ हजार रुपये मिळतील. या व्यतिरिक्त त्यांना ४५ हजार रुपयांच्या आसपास पेंशन सुद्धा मिळेल. विशेष म्हणजे ही पेंशन त्यांना आजीवन मिळत राहिल.

किती मिळेल पेंशन- वय- ३० वर्षे, गुंतवणूकीचा एकुण कालावधी- ३० वर्षे, महिना गुंतवणुक- ५००० रुपये
गुंतवणुकीवर रिटर्न- १०, एकुण पेंशन फंड- १,११,९८,४७१ रुपये, एन्युटी प्लान खरेदीसाठी पैसे – ४४,७९,३८८ रुपये, अनुमानित एन्युटी रेट 8 टक्के -६७,१९,०८३ रुपये, मंथली पेंशन- ४४,७९३ रुपये.

NPS ही केंद्र सरकारची सोशल सिक्योरिटी स्कीम (Social Security Scheme)आहे. या स्किममध्ये तुम्ही जो पैसा गुंतवता त्याचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड मैनेजर्स करतात. त्यांना ही जबाबदारी केंद्र सरकारने दिलेली असते. NPS मध्ये तुमची गुंतवणुक पुर्ण पणे सुरक्षित आहे. पण तुम्ही यात जी गुंतवणुक कराल त्याच्या रिटर्नची गॅरेंटी नाही. फाइनेंशियल प्लानर्समते NPS सुरुवातीपासुन ते आतापर्यंत वार्षिक १० ते ११ टक्के रिटर्न देते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.