Headlines

तेलकट पदार्थ झाल्यानंतरही वजन आणि कोलेस्टेरॉल वाढू नये असे वाटत असेल तर या गोष्टी करा !

कोणी कितीही हेल्थ कॉन्शिअस का असे ना प्रत्येकाला एकदा तरी फ्रेंच फ्राइज, बर्गर, समोसा सारखे पदार्थ खावेसे वाटतातच. हे सर्व पदार्थ ट्रांसफैट, मीठ आणि सेचुरेटेड फैटने युक्त असतात. पण त्यात फाइबर, विटामिन आणि मिनरलची मात्रा कमी असते. त्यामुळे वजन वाढते, कॉलेस्ट्रॉल लेव्हल आणि ब्लड प्रेशर वाढते तसेच टाइप-2 डायबिटीज आणि हार्ट डिसीजचा धोका पण वाढतो. या गोष्टी दुर ठेवायच्या असतील तर जास्त तेल असलेले खाद्यपदार्थ सेवन करु नका. पण समजा तुम्ही तेलकट पदार्थ खाल्लेच तर काही नियमांचे पालन करा जेणे करुन पोटदुखी , सुज काही प्रमाणात कमी केले जाऊ शकते.

तेलकट  पदार्थ खाल्यानंतर काय करावे –
कोमट पाणी प्यावे – तुम्ही नकळत जास्त तेलकट  पदार्थ खाल्ले असतील तर काळजी नका करु. कोमट पाणी प्यायल्याने तुमची पाचन क्रिया शांत आणि सक्रिय होईल. गरम पाणी प्यायल्यामुळे पोषक तत्वांना डाइजेस्टेबल फॉर्म मध्ये तोडण्यास मदत होते. जर तुम्ही मुबलक प्रमाणात पाणी नाही प्यायलात नाही तर छोटे आतडे जेवणातुन पाणी शोषुन घेते. त्यामुळे निजर्लीकरण आणि कब्जची समस्या होते.

फळ आणि भाज्या खा – ट्रांसफैट आणि सेचुरेटेड फैटच्या सेवनामुळे पित्त होते. यासाठी फळ आणि भाज्या शरीरातील विविध प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी विटामिन, फाइबर आणि मिनरलची कमी पुर्ण करतात. सकाळी उर्जादायक आणि फ्रेश फिल करण्यासाठी सकाळच्या नाश्तात एक वाटी मेवा आणि बिया असलेली फळे खावी. शरीरातील पोषक तत्वांची कमी पुर्ण करण्यासाठी एक वाटी सॅलाड आणि ताज्या भाज्यांनी जेवणाची सुरुवात करावी.

डिटॉक्स ड्रिंक घ्यावे – कोणतेही तेलकट  पदार्थ खाल्ल्यानंतर डिटॉक्स ड्रिंक घेतल्यास सिस्टीममध्ये जमा होणारे अतिरिक्त पदार्थ लगेच शरीराबाहेर पडतात. लिंबाचा रस प्यायल्यास किंवा लिंबाचा डिटॉक्स डाएट फॉलो केल्यास शरीरातील चरबी कमी होते.

प्रोबायोटिक्सचे सेवन करावे – प्रोबायोटिक्सचे नियमित सेवन केल्यास पाचन संस्था स्वस्थ होते. तसेच इम्युनिटी स्ट्रॉंग होते. तेलकट  फुड खाल्यानंतर एक कप दही खा त्यामुळे पोटाला खुप आराम मिळतो.

फिरायला जा – तेलकट पदार्थामुळे पोट जड होते. त्यामुळे असे पदार्थ सेवन केल्यास थोडे चाला. कमीत कमी ३० मिनीटे चालल्यास पाचन क्रियेत खुप सुधार होतो. तसेच चालल्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.

चांगली झोप घ्या – झोप चांगली घेतल्यास तुमचा मुड सुद्धा बुस्ट होतो. तसेच तुमच्या शरीरालापण आराम मिळतो. त्यामुळे तेलकट  फुड खाल्यानंतर शक्य तितका आराम करा.

तेलकट  फुड खाल्यानंतर या गोष्टी करु नका – थंड खाऊ नका – खुप जास्त तेलकट खाल्यानंतर थंड पदार्थ खाणे टाळा. आईसक्रिम सारखे थंड पदार्थ खाल्यावर लीवर, आतडे आणि पोटाला नुकसान होते. तेलकट पदार्थ आधीच पचायला जड असतात शिवाय त्यात अजुन थंड पदार्थ खाल्यास ते पचायला आणखी वेळ लागतो. काही वेळा अन्न नीट पचले नाही तर पोटाला सुज येते.

पुढील जेवणाची प्लॅनिंग – दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी स्वस्थ आणि पौष्टिक नाश्ता करा.आहारात भाज्यांचा समावेश करा. तसेच मुबलक प्रमाणात पाणी, ज्युस प्या.

खाल्यानंतर लगेच झोपू नका – भारी भोजन केल्यावर लगेच झोपु नका. रात्री खाल्यानंतर झोपेच्या मध्ये निदान २ते ३ तासाचा अंतर असले पाहिजे. खाल्यानंतर लगेच झोपले तर अन्न व्यवस्थित पचत नाही. या सर्व गोष्टी केल्यास शरीर स्वास्ठ राहते. कोणी कितीही हेल्थ कॉन्शिअस का असे ना प्रत्येकाला एकदा तरी फ्रेंच फ्राइज, बर्गर, समोसा सारखे पदार्थ खावेसे वाटतातच. हे सर्व पदार्थ ट्रांसफैट, मीठ आणि सेचुरेटेड फैटने युक्त असतात. पण त्यात फाइबर, विटामिन आणि मिनरलची मात्रा कमी असते.

त्यामुळे वजन वाढते, कॉलेस्ट्रॉल लेव्हल आणि ब्लड प्रेशर वाढते तसेच टाइप-2 डायबिटीज आणि हार्ट डिसीजचा धोका पण वाढतो. या गोष्टी दुर ठेवायच्या असतील तर जास्त तेल असलेले खाद्यपदार्थ सेवन करु नका. पण समजा तुम्ही तेलकट पदार्थ खाल्लेच तर काही नियमांचे पालन करा जेणे करुन पोटदुखी

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !