कोणाच्या पदरात कधी सुख पडेल सांगता येत नाही. पण ते सुख कधी निघुन जाईल हे देखील सांगता येत नाही. काहींच्या वाटेला क्षणीक सुख पदरी येते. असेच काहीसे औरंगाबाद येथील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडले. त्या शेतकऱ्याच्या जनधन खात्यात अचानक १५ लाख रुपये आले. हे पैसे सरकारकडुनच त्याच्या खात्यात आले असतील असे त्याचा सुरुवातीला समज झाला. त्यासाठी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी पत्र लिहीले. पण ५ महिन्यांनंतर त्याच्यासोबत जे घडले त्याचा त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ज्ञानेश्वर जनार्दन औटे यांना बॅंकेकडुन नोटीस आली. त्यात लिहीले होते कि, तुमच्या खात्यात आलेली रक्कम ही चुकन टाकली गेली आहे. त्यामुळे ती रक्कम पुन्हा परत करा. ज्ञानेश्वर जनार्दन औटे यांचे बॅंक ऑफ बरोडा मध्ये जनधन खाते होते. त्या खात्यात १७ ऑगस्टला २०२१ ला १५ लाख रुपये जमा झाले.
त्यावेळी २०१४ च्या निवडुणकीला मोदी सरकार ने प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील असे वचन दिले होते तिच वचनपुर्ती आता केली असेल असा समज शेतकऱ्याचा झाला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने त्या पैशांतील ९ लाख रुपये काढले आणि त्यातुन घर बनवले. ही बातमी पुढे वाऱ्यासारखी संपुर्ण गावात पसरली.
पण पाच महिन्यांनंतर शेतकऱ्याला जेव्हा बॅंकेकडुन नोटीस मिळाली तेव्हा त्याची झोपच उडाली. त्यात बॅंकेने त्यांच्याकडुन चुक झाली असे सांगत पैसे परत मागितले. पण शेतकरी पैसे परत करु शकत नसल्यामुळे बॅंकेकडुन त्याच्यावर दबाव आणला जात आहे. पण शेतकऱ्याकडे सध्या एवढी रक्कम नसल्याचे तो सांगत आहे.
बॅंकवाल्यांचे म्हणणे आहे की पिंपळवाडी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाकडुन देण्यात आलेले पैसे मिळाले नाही. पण नंतर ते पैसे जेव्हा ज्ञानेश्वर यांच्या खात्यात गेल्याचे समजताच बॅंकने त्यांना नोटीस पाठवली.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !