मनातील ध्येय पक्के असेल आणि ते ध्येय पुर्ण करण्याची इच्छा शक्ती असेल तर ते ध्येय पुर्ण झाल्या वाचुन राहत नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जी इतरांना स्फुर्ती देत असतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे बलवंत पारेख. बळवंत पारेख हे जगप्रसिद्ध फेविकॉल कंपनीचे संस्थापक आहेत. भारतातील शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत बलवंत पारेख यांचे नाव येते.
बलवंत पारेख यांनी संपादन केलेले हे यश एका दिवसात मिळालेले नाही. त्यासाठी त्यांना अपार कष्ट करावे लागले होते. सुरुवातीला त्यांनी एक सर्वसाधरण शिपाई म्हणुन काम केले होते. त्यानंतर दिवस रात्र कष्ट करत त्यांनी एवढी मोठी कंपनी उभारली. आज आम्ही तुम्हाला बलवंत पारेख यांचा शिपाई ते फेविकॉल कंपनीचे संस्थापक पर्यंतचा प्रवास कसा होतो ते सांगणार आहोत.
अरबांमध्ये पैसे कमावणाऱ्या फेविकॉल कंपनीच्या संस्थापकांचा जन्म १९२५ मध्ये गुजरात मधल्या महुआ गावांत झाला. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य होते. सुरुवातीला त्यांना सुद्धा व्यापारी बनण्याची इच्छा होती. पण ते तितके सोप्पे नव्हते कारण त्यांच्या घरच्याना बलवंत यांनी वकिल बनावे अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सरकारी लॉ कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणास सुरुवात केली.
घरच्यांच्या इच्छे खातर शिक्षण घेण्यासाठी बलवंत मुंबईत तर आले पण त्यांच्या मनात काही वेगळेच होते. त्याचवेळी देशात सर्वत्र क्रांतीची लाट पसरली होती. त्याकाळी अधिकतर युवक गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होते. त्यातीलच एक बलवंत पारेख सुद्धा होते. त्यांनी सुद्धा गांधीजींसोबत भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. हळुहळु पारेख त्या आंदोलनात इतके सरमिसळुन गेले कि कुठेतरी त्यांचे शिक्षण मागे पडत चालले होते.
त्यांनंतर त्यांनी पुन्हा एका वर्षाने अभ्यास करण्यास सुरुवात केली. पण वकीलीचे शिक्षण घेतले नाही. मुंबईत राहण्यासाठी त्यांना नोकरी करावी लागली. सुरुवातीचे दिवस घालवण्यासाठी त्यांनी एका प्रिंटींग प्रेस मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. ते नोकरीसुद्धा मनापासुन करत नव्हते कारण त्यांना व्यापार करायचा होता. पण त्यांच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. आणि काही दिवसांनी त्यांनी ती सुद्धा नोकरी सोडली. आणि नंतर एका लाकडाचे काम करणाऱ्या व्यापाऱ्याकडे शिपाई म्हणुन काम करु लागले.
शिपायाचे काम करताना त्यांना एकदा जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या बिझनेसच्या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी पश्चिमेकडील देशातुन काही गोष्टी आयात करण्यास सुरुवात केली होती. हळुहळु त्यांच्या व्यापारालासुद्धा गति येत होती. दुसरीकडे देश सुद्धा आझाद झालेला. त्यामुळे व्यापारांना देशी उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात होते. याचाच फायदा बलवंत यांनी घेतला आणि त्यामुळेच देशाला उत्कृष्ठ दर्जाचा सुगंधी असा फेविकॉल मिळाला.
आता काहींच्या मनात विचार आला असणार की जो व्यक्ती एखाद्या शिपायाचे काम करत होता, ज्याने आंदोलन करण्यासाठी सहभाग घेतला त्याच्या मनात फेविकॉल तयार करण्याचा विचार कसा आला. तर त्याचे झाले असे कि जेव्हा पारेख लाकडाच्या व्यापाऱ्याकडे काम करायचे त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना लाकडांना जोडण्यास खुप त्रास होत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी लाकडांना जोडण्यासाठी च*र*बी*चा वापर केला जायचा. जे कारागीरांसाठी खुप त्रासदायक होते. त्यामुळे आपण काहीतरी असे बनवु ज्यामुळे त्रासदायक काम कमी होतील असे पारेख यांच्या मनात आले.
फेविकॉल ही कनसेप्ट मोठी करण्यासाठी त्यांनी योग्य खुप मेहनत घेतली व त्याची जबरदस्त मार्केटींगसुद्धा केली. बुद्धी आणि मेहनत एकत्र झाली तर अशक्य कामे सुद्धा शक्य होतात. हे पारेख यांना योग्यप्रकारे समजले होते त्यामुळेच त्यांनी वकीली सोडुन व्यापार करणे योग्य समजले. आणि एका मोठ्या कंपनीचे मालक झाले. त्यांच्या या विकास माध्यमाने ना केवळ वस्तु जोडल्या तर त्या सोबतच त्यांनी देश जोडण्याचे सुद्धा काम केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !