उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील कोतवाली येथे राहणाऱ्या एका तरुणीने पती न’पुं’स’क असल्याची आणि तो हुंड्याची मागणी करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीत मुलीने सासरकडच्यांकडून हुं’ड्या’साठी छ’ळ होत असल्याचा आरोप केला आहे.
मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासऱ्यांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, इंदूरच्या प्रखर मिश्रासोबत तिची भेट एका जीवनसाथी अॅपद्वारे झाली. त्यावेळी तिला प्रखरच्या आयडीवर त्याची बहीण पंखुरी मिश्रा आणि वडील पवन मिश्रा यांचा मोबाईल नंबर मिळाला.
नंतर तिने प्रखरच्या वडिलांना फोन केला. प्रखरच्या वडिलांनी तिचे बोलणे आपली पत्नी अपर्णा मिश्रासोबत करुन दिले. त्यानंतर त्यांनी पीडितेचा बायोडेटा घेतला. काही दिवसांनी प्रखरच्या बहिणीने पीडितेला एक मेसेज केला, ज्यामध्ये तिने माझ्या भावाला तू आवडतेस असे सांगितले.
पिडितेने पुढे सांगितले की, 13 ऑगस्ट 2019 रोजी तिचे सासरे हरदोई येथे आले होते. त्यांनी मला पाहिले आणि रात्रीचे जेवण कुटुंबासह केले. त्यानंतर पीडितेची सासू आणि पती प्रखर 5 फेब्रुवारी 2020 रोजी हरदोई येथे आले, 6 फेब्रुवारीला पीडितेचा आणि प्रखरचा कोर्ट मॅरेज झाले. त्यानंतर 7 फेब्रुवारीला सासरचे लोक इंदूरला गेले आणि पण पीडिता हरदोईच्या घरात राहिली.
त्यानंतर सासरच्यांनी पीडितेच्या वडिलांकडे 11 सोन्याच्या अंगठ्या, एक जाड सोन्याची चेन आणि 11 लाख रुपयांची मागणी लग्नात केली. पण त्यावेळी सर्वत्र कोरानाचे सावट असल्यामुळे पीडितेचे हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न होऊ शकले नाही. यानंतर पीडितेचा व्हिसा तयार झाला. ती तिच्या सासरकडच्यांच्या सांगण्यावरून अमेरिकेला गेली.
ती 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत तिच्या नंणदेच्या घरी राहिली, त्यानंतर 16 फेब्रुवारी 2021 रोजी पीडितेचे हिंदू संस्कृतीनुसार लग्न झाले. 17 फेब्रुवारी 2021 रोजी ती तिच्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहूण्यास गेली. 1 डिसेंबर 2021 पर्यंत राहिली. त्यावेळी पीडितेचा पती प्रखरने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली, आजारी असताना उपचार करायचा नाही तसेच धड जेवायलाही देत नव्हता.
पीडितेच्या नंणद तिला शिव्या द्यायची , रागाच्या भरात पती प्रखरने तिला बेदम मारहाण करत तिचे बोट तोडले होते. पीडितेने तिच्या पतीला शारीरिक समस्या (न’पुं’स’क) असल्याचे सांगितले. तिला ज्यावेळी हा प्रकार समजला तेव्हा तिने तिच्या सासू व सासऱ्यांना ते सांगितले. त्यावर पीडितेच्या सासऱ्यांनी तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्यास सुरुवात केली.
तुझा नवरा देऊ शकत नाही ते सुख आम्ही देऊ असे त्यांनी पिडितेला सांगितले. पीडितेने त्यावर विरोध केल्यानंतर तिच्या कुटुंबासह तिला चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची ध’म’की देऊ लागले. पण प्रकरण अगदी अंगाशी आल्यावर आणि खूप अस्वस्थ झाल्यानंतर पीडितेने संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली.
ज्यावर कुटुंबीयांनी पीडितेला ४ डिसेंबर २०२१ रोजी घरी बोलावले. तेव्हापासून पीडिता तिच्या घरीच आहे. 12 मार्च 2022 रोजी पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय इंदूर येथे सासरच्या घरी गेले असता, सासरे आणि सासूने दार लावून त्यांना घरात प्रवेश करू दिला नाही. एवढेच नाही तर पीडितेच्या सासऱ्याने सांगितले की, मी इंदूरमध्ये डीएसपी आहे, इथे बसून मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात अडकवू शकतो.
27 डिसेंबर 2021 रोजी पीडितेची नंणद अमेरिकेहून इंदूरला परत आली तेव्हा तिने पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना फोन करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सासरच्यांनी पीडितेला धमकावत म्हटले की आम्हाला हलक्यात घेऊ नका, इंदूरमध्ये बसून वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवून तुमचे आयुष्य उ’द्ध्व’स्त करीन.
पीडितेने पुढे सांगितले की, 7 जुलै 2022 रोजी जेव्हा तिचे सासरे पत्नीसह हरदोई येथे आले तेव्हा त्यांनी तिला कारमध्ये बसवून तिच्या वडिलांना चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि पीडितेच्या कुटुंबाला शिव्या देत होता.सध्या पीडितेच्या तक्रारीवरून शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, सासरा, नणंद, नणंदेचा पती यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचे सासरे पवन मिश्रा हे पोलिस खात्यात डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.