आपल्याकडे प्रत्येक रंगाला एक वेगळे महत्त्व असते. मूळ रंग हे सात असतात परंतु हे सात रंग एकमेकांमध्ये मिसळून इतर रंग तयार केले जातात. लग्नाचा हंगाम सुरू झाला की खरेदीला उधाण येते. नवरा नवरी ने कोणते कपडे घालावेत, कसे कपडे मॅचींग करावेत यावर विचार सत्र सुरू होते.
हिंदू लग्नामध्ये नवरा नवरी काळे कपडे परिधान करत नाहीत. कारण आपल्याकडे काळा रंग हा अशुभ मानला जातो. तर त्या बदली वरा नवर्यांना लाल रंगाचे कपडे दिले जातात आणि त्यानंतरच लग्न लावले जाते. लग्नामध्ये नवरी च्या प्रत्येक गोष्टीत लाल रंगाला खूप महत्त्व दिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का लग्नामध्ये नवरीला लाल रंगाचे कपडे का दिले जातात.
आजकाल बाजारात अनेक वेगवेगळ्या रंगाचे व वेगवेगळ्या फॅशनचे लग्नसराईतले कपडे उपलब्ध आहेत. काळ बदलला तसा लाल रंगाचे कपडे परिधान करावे ही एक अंधश्रद्धा मानली जाऊ लागली. त्यामुळे लग्नात नवरा नवरी आणि त्यांचे नातेवाईक लाल रंगाचे कपडे घालावेत ही एक अंधश्रद्धा मानून वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करताना दिसतात.
परंतु ज्योतिष शास्त्रानुसार शुभकार्यासाठी त्यातही लग्नासारख्या शुभकार्यासाठी लाल, पिवळ्या आणि गुलाबी रंगाला अधिक मान्यता दिली जाते. लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. शिवाय यामागे वैज्ञानिक तथ्य म्हणजे लाल रंग हा ऊर्जेचा स्त्रोत आहे. लाल रंगांमधून नेहमी एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते.
निळ्या, राखाडी किंवा काळा रंगांना लग्नासारख्या शुभकार्यात वापरले जात नाही कारण हे रंग नैराश्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे कुठल्याही भावनांना ठेच पोहोचू नये यासाठी शुभकार्यात या रंगाच्या गोष्टी वापरणे टाळले जाते. शुभ कार्याच्या सुरुवातीसच कोणताही नकारात्मक विचाराने मनामध्ये जन्म घेतल्यास पुढील कार्य नीट संपन्न होत नाही तसेच नाते मजबूत होत नाहीत. त्यामुळेच लग्नासारख्या शुभकार्यात नवरीच्या प्रत्येक गोष्टीत लाल रंगाला महत्त्व दिले जाते.
Bollywood Updates On Just One Click