Headlines

गुरुवारी करा हे उपाय, तुमच्या घरात येईल धनसंपदा आणि वैवाहिक समस्या सुद्धा होतील दूर !

आयुष्यातील वेगवेगळ्या समस्येतुन सुटका करुन घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर बृहस्पति दोष असेल तर यामुळे धन, मालमत्ता तसेच लग्नाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच व्यक्तीच्या आयुष्यात पैशांसंबधी समस्या उद्भवतात.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु बृहस्पती हा वैवाहित जीवन आणि नशिबाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे गुरुवारी त्यांची पुजा केल्यास या ग्रहाचे दोष दूर होतात. आज आम्ही तुम्हाला गुरुवारी केल्या जाणाऱ्या उपायांबद्दल सांगणार आहोत. जे केल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करु शकता !

गुरु ग्रहापासुन जर तुम्हाला शुभ लाभ हवे असतील तर गुरुवारी भक्तीभावाने पुजा आणि उपवास करावा. यासाठी गुरवारी सकाळी लवकर उठावे आणि गुरु बृहस्पतिची प्रतिमा किंवा फोटो पिवळ्या रंगाच्या वस्त्रात लपेटुन त्याची स्थापना करावी. त्यानंतर पंचोपचारांनी त्याची पुजा करावी. पुजेवेळी केशर, चंदन, पिवळे तांदूळ, पिवळी फुले, आणि पिवळ्या रंगाचे व्यंजन किंवा पिवळ्या फळ अर्पण करु शकता. यानंतर आरती करावी. गुरुवारी पिवळी वस्त्रे धारण करावीत, तसेच उपवास करावा आणि मिठ नसलेले पदार्थ सेवन करावेत.

गुरु ग्रहाची कृपादृष्टी राहण्यासाठी गुरुमंत्राचा असा करावा जप – जर तुम्ही गुरुवारी व्रत करत असाल तर पुजेवेळी निर्मळ मनाने ऊं बृं बृहस्पते नम: या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप १०८ वेळा होईल याची काळजी घ्यावी.

गुरुवारी या गोष्टींचे करावे दान – जर तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तुंचे दान केल्यास त्याचे तुम्हाला चांगले फळ मिळेल. या दिवशी तुम्ही चण्याची डाळ, हळद यांसारख्या गोष्टींचे दान करु शकता. या व्यतिरीक्त या दिवशी भगवान शंकरांना बेसनच्या लाडुचा नैवेद्य दाखवावा. हे उपाय केल्यास धनसंपत्ती मध्ये वाढ होईल. तसेच वैवैहिक समस्या दूर होतील. यामुळे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण होतील.

गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या राशीतील गुरु ग्रह होईल मजबुत – शास्रानुसार गायत्रीमंत्रालाच गुरुमंत्र म्हटले जाते. जर कुठल्या व्यक्तीचा कोणीच गुरु नसेल तर त्या व्यक्तीने सूर्याला त्याचा गुरु मानुन दररोज १०८ वेळा गायत्रीमंत्राचा जप केला पाहिजे. हा उपाय केल्यास गुरु ग्रह दोष दूर होईल. तसेच अनेक अडचणी सुद्धा दूर होतील.

वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा – जर कोणा व्यक्तीच्या कुंडलीत गुरु दोष असेल तर त्या व्यक्तीने वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. यामुळे कुंडलीत गुरु ग्रह दोष कमी होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.