Headlines

एक लीटर पेट्रोलमागे टॅक्स किती भरला जातो ? जाणून घ्या !

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगातील बरेच मोठे देश लॉकडाउन आहेत आणि निश्चितच या लॉकडाउनचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर पडत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झाली आहे. अमेरिकेमध्ये कच्च्या तेलाची भविष्यातील किंमत फारच कमी झाली आहे.
पण तरीही आपल्या बाजारांमध्ये पेट्रोल ७६ रुपये प्रति लीटरप्रमाणे मिळत आहे तरं डिझेल ६६ रुपये प्रति लीटरप्रमाणे मिळते. पण जगभरात सगळ्याच ठिकाणी जर पेट्रोल – डिझेल स्वस्त झालं असेल तरं आपल्याइथे इतके महागडे का मिळते?
भारतामध्ये भले ही पेट्रोलियम पदार्थांची मागणी वाढली असली तरीही आपण ते आपल्या इथे उत्पादित करू शकत नाही. आपल्याला आवश्यक असलेले ८५ टक्के कच्चे तेल आपल्याला आयात करावे लागते. म्हणजेच जर का विदेशी बाजारपेठेमध्ये पेट्रोल – डिझेल महाग होतं असेल तरं आपसुकच ते आपल्याजवळील बाजारपेठेत महाग होणार आणि जर कच्चे तेल स्वस्त झाले तर पेट्रोलशी निगडित उत्पादन स्वस्त होतील. चला तरं आज पाहूया की आपल्या एक लीटर पेट्रोल मध्ये कोणकोणत्या गोष्टी सामिल असतात.
२०१४ ते २०१६ या काळादरम्यान कच्च्या तेलाची किंमत खूप मोठया प्रमाणात कमी होत होती आणि या गोष्टीचा फायदा सामान्य नागरिकांना होऊ देण्याऐवजी सरकारने एक्साइज ड्यूटीच्या रूपात स्वतःची कमाई करून घेतली आहे. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ या दिवसांमध्ये केंद्र सरकारने ९ वेळा एक्साइज ड्यूटी वाढवली. याच एक्साइज ड्यूटीच्या माध्यमातून साल २०१४ – १५ आणि २०१८ – १९ मध्ये केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील टॅक्सच्या रूपात १० लाख करोड़ रुपये कमवले. पेट्रोल – डिझेलवरील व्हॅटमुळे राज्य सरकारने लाखो पैसे कमवले. २०१४ – १५ मध्ये व्हॅटच्या रूपात १.३ लाख करोड रुपये कमवले. २०१७ – १८ मध्ये या पैशात वाढ होऊन १.८ लाख करोड रुपये कमवले. यावेळेस देखील जेव्हा किंमतीमध्ये घट निर्माण झाली तेव्हा केंद्र सरकारने यावर टॅक्सचे प्रमाण वाढवले.
२८ रुपये लीटर पेट्रोलवर ४३ रुपये टॅक्स लावला जातो. म्हणजे आपण जवळ जवळ ७० रूपये लीटर या दरामध्ये पेट्रोल विकत घेतो तेव्हा सर्वच पैसा पेट्रोल कंपनीला देतो असे नाही तर टॅक्सच्या रूपात अर्धी किंमत केंद्र व राज्य सरकारला देत असतो. देशातील सर्वात मोठ्या ऑइल मार्केटिंग कंपनी “इंडियन ऑइल” कडून मिळालेल्या माहितीवरून सध्याच्या घडीला दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलची फॅक्टरी किंमत २७.९६ रुपये आहे. तर केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीच्या रूपात २८.२८ रुपये, वाहनाचा खर्च ३२ पैसे, डीलर कमिशन ३.५४ पैसे आणि राज्य सरकारचे व्हॅटच्या रूपात १४.७९ रुपये म्हणजे एकूण किंमत ६९.५९ रुपये होतात.
१६ एप्रिल २०२०पर्यंत दिल्लीमधील टॅक्ससहित एक लीटर पेट्रोलची किंमत ६९.५९ रुपये इतकी होती.
डिझेलवर टॅक्ससुद्धा काही कमी नाही. दिल्लीमधील एक लीटर डिझेलची फॅक्टरी किंमत ३१.४९ रुपये आहे. वाहनाचा खर्च २९ पैसे, केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीच्या रूपात १८.८३ रुपये, डीलर कमिशन २.४९ पैसे आणि राज्य सरकारचे व्हॅटच्या रूपात ९.१९ रुपये म्हणजे एकूण किंमत ६२.२९ रुपये होतात. १६ एप्रिल २०२० पर्यंत दिल्लीमधील टॅक्ससहित एक लीटर डिझेल किंमत ६२.२९ रुपये इतकी होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *