Headlines

अशी होती ‘रोहित शर्मा’ आणि ‘रितिका सजदेह’ यांची लव स्टोरी, युवराज सिंगने केली मध्यस्थी !

संपूर्ण जगात हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माचा नुकताच वाढदिवस झाला. क्रिकेटच्या दुनियेत रोहित शर्मा च्या नावावर अशा काही रेकॉर्डस् ची नोंद आहे जे आजपर्यंत कोणीच तोडू शकले नाही किंवा सध्याच्या काळात ते तोडू शकतील अशी काही लक्षणे सुद्धा नाहीत. रोहित शर्माचा नुकताच ३३ वा वाढदिवस झाला. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला त्याच्या प्रेमकहाणी बद्दल सांगणार आहोत.
आपण सर्वांनीच पाहिली असेल कि जेव्हा जेव्हा रोहित शर्मा मैदानात बल्लेबाजी करत असेल त्यावेळेस ऑडियन्स मध्ये बसलेली त्याची पत्नी रितिका सजदेह ही नेहमीच त्याला प्रोत्साहित करत असते. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह हे दोघे लग्नाआधी खूप काळापर्यंत एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते त्यानंतर त्यांनी आपण एकमेकांसोबत कम्फर्टेबल आहोत आणि संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढू शकतो हे समजल्यावर लग्नाचा विचार केला.
आता तर या दोघांना एक छोटीशी गोड मुलगी सुद्धा आहे. तिचे नाव समायरा असून ती रोहितच्या क्रिकेट सामन्यादरम्यान दरवेळी ऑडियन्स मध्ये तिच्या आईसोबत दिसते. रोहित शर्मा चा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपुर येथे झाला होता. टीम इंडिया मधून क्रिकेट खेळण्यापूर्वी रोहित शर्मा मुंबई टीम मधून क्रिकेट खेळायचा.

हे वाचा – चित्रपटातील चकित करणारी दृश्ये वास्तवात अशी चित्रित केली जातात !

एवढेच नव्हे तर तो आता सुद्धा आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स टीम साठीच खेळतो. काही दिवसांसाठी तो डेक्कन चार्जर या टीम साठी सुद्धा खेळला होता परंतु नंतर तो मुंबई इंडियन्स टीम सोबत जोडला गेला आणि अजून सुद्धा त्याच टीमसाठी खेळत आहे. विशेष म्हणजे तो मुंबई इंडियनस् या आयपीएल मधील टीमचा कॅप्टन आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनशिप खाली मुंबई इंडियन्स ने चार वेळा आयपीएल ची ट्रॉफी जिंकली आहे.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची लव्ह स्टोरी कधी व कुठं पासून सुरु झाली. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांची ओळख युवराज सिंह ने करून दिली होती. रितिका सजदेह युवराज सिंहची बहीण आहे ती त्याला राखी बांधते. ज्यावेळेस रोहितने रितिकाला पहिल्यांदा बघितले त्यावेळी तो तिला पाहतच राहिला. त्यावेळी तर युवराज सिंह ने रोहित शर्माला गमतीने ठणकावले होते की तिच्याकडे बघू नकोस ही माझी बहीण आहे !

हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !

त्यानंतर रोहित व रितिकाच्या भेटीगाठी वाढत गेल्या. रितिका एक स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर आहे आणि ती रोहित ची क्रिकेट मॅनेजर म्हणून काम सुद्धा करायची. आधी या दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होत गेले. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रोहित ने रितिका लग्नासाठी प्रपोज केले. पण ही प्रपोज करण्याची गोष्ट सुद्धा खूप मजेदार आहे.
मुंबईतील बोरीवली स्पोर्ट्स क्लब मध्ये रोहितने गुडघ्यावर बसून अंगठी देऊन रितिका ला प्रपोज केले होते. रोहित ने अचानक दिलेले सप्राईज बघून रितिका चकित झाली होती. पण रोहित ने आधीपासूनच रितिका च्या मनात घर तयार केले होते त्यामुळे ती त्याला नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता. रितीकाने होकार दिल्यावर रोहित शर्माने स्वतः ही बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट केली होती.

हे वाचा – अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

रोहित ने रितिका सोबतचा फोटो शेअर करून खाली कॅप्शन लिहिले की बेस्ट फ्रेंड पासून आम्ही सोलमेट झालो याहून अधिक चांगलं काहीच असू शकत नाही. १३ डिसेंबर २०१५ ला रितिका व रोहित शर्मा ने लग्न केले. त्यांनी त्यांचे ग्रँड लग्न ताज लॅण्डस् हॉटेलमध्ये केले तेव्हा क्रिकेट जगतातील अनेक मातब्बर क्रिकेटर तसेच बॉलीवूड आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मोठ्या मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

रितिका च्या आधी रोहित शर्मा मॉडेल सोफिया हयात सोबत काही काळासाठी रिलेशन मध्ये होता. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली की सोफिया हायात तिच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहीत आहे त्यामध्ये रोहित शर्मा आणि तिच्या नात्याबद्दल सुद्धा ती काही लिहिणार आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोफिया हयात मे दावा केला होता की ती रोहित शर्मा सोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि ही गोष्ट ती तिच्या पुस्तकात सुद्धा समाविष्ट करणार आहे. तिने सांगितले की रोहित तिच्यावर खुप प्रेम करायचा ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते आणि कायम एकत्र राहायचे.

हे वाचा – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?

आम्ही दोघांनी खूप काळ एकमेकांसोबत व्यतीत केला आहे. त्यांच्यामध्ये सारे आलबेल असताना अचानक रोहितने लोकांना सोफिया ची ओळख त्याची मोठी फॅन आहे अशी करून दिली त्यावेळी तिच्या मनाला खूप मोठी ठेच पोहोचली. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दरार येत गेला. काही फोटो मध्ये त्या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे पण याहून अधिक काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवणे योग्य नाही.

हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *