Headlines

पोस्टाची नवीन जबरदस्त योजना, या योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता १६ लाख रुपये, जाणून घ्या कशी आहे योजना !

कोणत्याही गुंतवणूकीशी जोखीम ही संबंधित असते. जोखमीची क्षमता असलेली व्यक्ती तत्सम उत्पादनांमध्ये गुंतवणूक करते. जोखीम वाढली की परतावा देखील वाढतो. जिथे धोका कमी असतो तिथे परतावा देखील कमी असतो. इक्विटी मार्केटमधील जोखीम जास्त असल्याने उर्वरित गुंतवणूक उत्पादनांपेक्षा परतावा जास्त आहे.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारची जोखीम स्वीकारू शकत नसाल तर पोस्ट ऑफिस मधील छोट्या योजना एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पैसे वाचवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा नेहमीच एक उत्तम पर्याय मानला जातो… आता आपण दरमहा फक्त १०० रुपये वाचवून एक मोठा फंड मिळवू शकतो. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेमध्ये आपण अवघे १०० रुपये जमा करून मोठी रक्कम जमा करू शकतो.

ग्राहकांना पोस्ट ऑफिसमधून या योजनेवर चांगले व्याजदेखील मिळते. सोबतच आपले पैसे देखील सुरक्षित राहतात. आज आपण अशा एक अशी गुंतवणूक ज्यामध्ये जोखीम समान आहे आणि परतावा देखील चांगला असतो. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट हा गुंतवणूकीचा एक मार्ग आहे.

पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कशी सुरु कराल – छोट्या गुंतवणुकीसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. याच्या माध्यमातून आपण गुंतवणूक करत आपली स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट अकाउंट ही चांगलया व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्याची शासकीय हमी योजना आहे, यामध्ये आपण फक्त १०० रुपयांच्या अल्प रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकतो.

गुंतवणूकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही, आपण त्यात पाहिजे तितके पैसे ठेवू शकतो. पोस्ट ऑफिसमधील हे आरडी खाते कमीत कमी पाच वर्षांसाठी आपण उघडू शकतो. बँकांमध्ये हे खाते उघडण्याचा कालावधी सहा महिने, एक वर्ष व अगदीच जास्त दोन ते तीन वर्षाचा असतो. यात जमा केलेल्या पैशांवर तिमाहीने वार्षिक दराने व्याज लावले जाते आणि तिमाहीच्या वर्षाच्या अखेरीस चक्रवाढ व्याजासकट आपल्या खात्यामध्ये जोडले जाते.

याला व्याजदर किती मिळणार ? – रिकरिंग डिपॉझिट योजनेवर सध्या ५.८ इतके व्याज मिळत आहे. हा व्याज दर १ एप्रिल २०२० पासून लागू झाला आहे. तिमाही दरावर व्याज आकारले जाऊ शकते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी, आपल्या खात्यावर चक्रवाढ व्याज दिले जाते.

एकापेक्षा अधिक आरडी खाती उघडता येतात – आपण एकापेक्षा जास्त आरडी खाती उघडू शकतो. आपण लहान मुलांच्या नावेदेखील ही खाती उघडू शकतो. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत आपण त्या खात्यात किमान १० रुपये महिना ठेवून ५च्या गुणांकात कितीही रक्कम जमा करू शकता. म्हणजेच ज्या संख्येला आपण ५ने भागू शकतो, त्या रकमेचे खाते उघडावे.

या अकाउंट मध्ये कमीत कमी किती रुपये भरू शकतो – आपण यात कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये आपण १०० च्या दुप्पट पैसे जमा करू शकतो. म्हणजेच ज्या संख्येला आपण ५ने भागू शकतो त्या रकमेचे आपण खाते उघडू शकतो. या योजनेमध्ये अधिकतम गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

वेळेवर हफ्ते न भरल्यास काय होईल ? – आपल्याला खात्यात नियमित पैसे जमा करावे लागतील, जर आपण पैसे जमा केले नाही तर आपल्याला दरमहा टक्के दंड भरावा लागेल. आपण सलग चार हप्ते जमा न केल्यास आपले खाते बंद होईल. तथापि, खाते बंद झाल्यानंतरही पुढील दोन महिन्यांकरिता ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते.

कोण खाते उघडू शकतो ? – कोणीही व्यक्ती आपल्या नावावर अनेक आरडी खाती उघडू शकतात. किती खाती उघडू शकतो यावर बंधने नाहीत. दोन प्रौढ व्यक्ती एकत्र संयुक्त आरडी खातेदेखील उघडू शकतात. आधीच उघडलेले वैयक्तिक आरडी खाते कधीही संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते.

प्रत्येक महिन्याला १० हजार भरल्यास १६ लाख मिळणार – जर आपण पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये १० हजार रुपये १० वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो तर आपल्याला १० वर्ष झाल्यावर ५.८ या व्याज दराने १६ लाखपेक्षा ही जास्त रक्कम मिळू शकते.

महिना गुंतवणूक दर १०,००० रु, व्याज ५.८%, मैच्योरिटी १० वर्ष , १० वर्षानंतर मैच्योरिटी रक्कम = १६,२८,९६३ रुपये

पोस्ट ऑफिसमधील आरडी योजनेवर कर – रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूकीसाठी टीडीएस वजा केला जातो, जर ठेवी ४०,००० पेक्षा जास्त असेल तर दरवर्षी १०% दराने कर आकारला जाईल. आरडीवर मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रक्कमेवर कर आकारला जात नाही. करपात्र उत्पन्न नसलेल्या गुंतवणूकदारांना एफडी प्रमाणे फॉर्म 15 जी भरून टीडीएस वर सूट मिळू शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !