घरात लहान बाळ येणार असल्याची चाहूल लागताच सर्व घर आनंदून जाते. आणि जेव्हा ते बाळ प्रत्यक्षात घरी येते तेव्हा मात्र घरातले सर्व मंडळी त्या बाळाला खुश ठेवण्यासाठी नानाप्रकारचे प्रयत्न करत असतात. त्या बाळाचे गोड हसू पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो.
जेव्हा ते हसते तेव्हा मनाला एक वेगळीच शांती मिळते तसेच दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होतो. पण जर तुम्ही त्यांना कधी झोपलेले पाहिले असेल तर ते झोपेत सुद्धा हसत असल्याचे तुम्हाला दिसून येईल.
तुमच्या मनात लहान मुलं झोपेत का हसते याचा कधी विचार आला आहे का. त्यांना कोणती चांगली स्वप्ने पडत असतील का.. किंवा त्यांना जुने काहीतरी आठवत असेल. खरेतर झोपणे ही एक कठीण क्रिया आहे.
तुम्ही झोपेत असताना तुमच्या शरीरासोबत तुमचे मनही विश्रांती घेत असते. तुमचे शरीर बेशुद्ध अवस्थेत असते. पण त्यावेळी ते शरीराच्या आतील हालचालींवर प्रक्रिया करत असते.
नवजात मुलं झोपेत हसणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. काही अभ्यासात असे दिसून आले की लहान मुलं हसणे म्हणजे ते आनंदीत असल्याचे प्रतिक असते. तर काहींच्या मते हसणे हे एक्सप्रेशनऐवजी फक्त एक रिफ्लेक्स आहे. यामागचे खरे कारण काय आहे माहीत आहे का?
मुलं झोपेत का हसते ? नवजात मुलं कोणत्याही बाह्य उत्तेजनामुळे हसत नाहीत. मेंदूच्या एका विशिष्ट हालचालीमुळे लहान मुले झोपेत असूनही हसतात. रॅपिड आय मूव्हमेंट (REM) ही एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये मुलं स्वप्न पाहते आणि त्यांच्या स्वप्नांना प्रतिसाद म्हणून हसत असतात.
१. एनआरईएम स्टेज- हा झोपेचा पहिला टप्पा असतो. यामध्ये शरीर आराम करण्यास सुरुवात करते. श्वास हळूहळू मंदावतो. आणि मग हळूहळू व्यक्ती झोपेत जाते.
२. स्टेज २ – या टप्प्यात श्वास, पल्स रेट आणि तुमचे स्नायू शिथिल होतात. यासोबतच तुमच्या मेंदूतील क्रिया आणि मेंदूत निर्माण होणाऱ्या लहरीही कमी होऊ लागतात.
मुलांच्या झोपेचे चक्र –
संशोधनात असे दिसून आले की, नवजात मुलांमध्ये हे झोपेचे चक्र पहिल्याच म्हणजे आरईएम स्टेजपासून सुरु होते. साधारणता लहान मुले दिवसातून 16 ते 18 तास झोपतात कारण त्यांचे झोपण्याचे किंवा उठण्याचे कोणतेच वेळापत्रक नसते. लहान मुलं झोपेच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे आरईएमचा जास्त अनुभव घेते इ’न्वॉ’ल’न्ट’री मू’व’में’ट्स’चा प्रतिसाद म्हणून ते झोपेत हसतात.
लहान मुलांमध्ये झोपेत हसण्याची कारणे – भावनिक विकास होतो- जेव्हा बाळ झोपेतून उठते, तेव्हा बाळ नवीन आवाज ऐकते आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहते. त्यामुळे बाळाच्या आसपास जे काय घडते त्या गोष्टी बाळाच्या मेंदूत रेकॉर्ड होत असतात. अशापरकारे त्यांचा भावनिक विकास होऊन ती मुलं हसतात.
गॅस पास करणे- जेव्हा मुलं पोटातील गॅस बाहेर सोडते तेव्हा सुद्धा ते हसते. कारण त्यामुळे त्याला आराम मिळतो.
काही प्रकरणात मुलांना दौ’रे पडतात त्यामुळेही त्यांना हसायला येते. जर मुलांचे वजन कमी होत असेल, झोपेत त्रास होत असेल, दौरे पडत असतील, विनाकारण हसत असतील तर तातडीने डॉक्टरांना दाखवा. अशा गोष्टी काही केसमध्येच घडतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !