Headlines

फक्त हे घरगुती उपाय करा, डास तुमच्या घराकडे फिरकणार पण नाहीत !

दिवसेंदिवस वाढणा‍‍र्‍या शहरीकरणामुळे सार्वजनिक अस्वच्छतेचे प्रमाण तरच वाढले आहे आणि सोबतच पावसाळा आला की या अस्वच्छतेची दाहकता अधिक जाणवते. पावसाळा येऊन गेल्यानंतर डासांचे प्रमाण अधिक वाढलेले असते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढते.

मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली क्रीम्स, स्प्रे, मैट्स केमिकलयुक्त उत्पादन वापरल्यास त्याचा उलट परिणाम मानवी शरिरावरच होतो. परंतु डासांचे प्रमाण वाढले असल्यामुळे त्यांच्यापासून सुटका काही मिळत नाही. आज आपण अशा काही वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या वनस्पती आपण घरात व घराच्या आजूबाजूला त्यांची लागवड केल्याने घरांजवळ डास फिरत नाहीत.

जेणेकरून आपण डेंग्यू मलेरियासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. घरा समोरील बागेत किंवा खिडकीमध्ये या झाडांची लागवड करणे अतिशय उपयुक्त ठरते.

१. तुळस – तुळशीच्या रोपट्याची पूजा केली जाते. त्यामुळे अनेकांच्या घरी तुळशीचे रोपटे असते. तुळशीच्या रोपटे आपल्या घराच्या परिसरातील वातावरण शुद्ध ठेवते. सोबतच तुळशीच्या पानांच्या सुगंधामुळे डास घरात प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे डासांपासून आपला बचाव करण्यासाठी तुळशीचे रोपटे आपण आपल्या घराच्या प्रांगणात किंवा खिडकीमध्ये लावू शकतो.

२. कडुलिंब – सर्वात गुणकारी मानलं जाणारं झाड म्हणजे कडुलिंब. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून सुटका मिळवायची असेल तर घराच्या आसपास वा मोठ्या एका कुंडीत कडुलिंबाचे झाड नक्की लावावे. कडुलिंबामुळे डास तर येतं नाहीतच पण सोबत माश्या, इतर प्रकारचे किडे देखील घरात प्रवेश करत नाहीत.

३. झेंडू – झेंडूचे फुल हे समारंभांना सजावटीसाठी व देवपूजेसाठी वापरला जातो. एक आश्चर्यकारक गोष्ट अशी की डास व माशांना झेंडूच्या फुलाचा सुवास बिलकुल आवडत नाही. त्यामुळे माशा व मच्छर पासून सुटका मिळवण्यासाठी झेंडूच्या फुलाचे झाड आपल्या घराच्या आसपास नक्की असावे.

४. रोजमेरी – रोझमेरी हे एक एक नैसर्गिक डास दूर करणारे झाड आहे. रोझमेरी हे रोपटं ४ ते ५ फुटापर्यंत वाढतात आणि या रोपट्याचा जीवनकाल २ वर्षांचा असतो. रोझमेरीला निळ्या रंगाची फुल येतात. रोझमेरीचं रोप घराजवळ लावल्याने घराच्या आसपास डास फिरकत नाहीत. रोझमेरी, रोझमेरीचे तेल अनेक अनेक आजारांवर देखील उपायकारक असते.
५. लॅवेंडर – लॅवेंडरचे रोपटे मुख्यत्वे डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी लावले जाते. या रोपट्याची जास्त देखभाल करावी लागत नाही, ते आपणहून मोठे होते. लॅवेंडरचे तेल देखील इतर किटाणू दूर करण्यासाठी उपयोगी ठरते.
६. सिट्रोनेला ग्रास – डासांना दूर पळवण्यासाठी सिट्रोनेला ग्रास हे खूप उपयोगी झाड आहे. हे रोपटे घराजवळ लावल्याने मलेरिया, डेंग्यू सारखे डास निर्माण करणाऱ्या एडीज एजिप्टी डास देखील आपल्या घरापासून दूर राहतात. या सिट्रोनेला ग्रासपासून तेल देखील बनवले जाते. या तेलाचा उपयोग साबण, सेंट आणि डास दूर राहणाऱ्या अगरबत्ती बनवताना केला जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !