Headlines

६ तासासाठी फे’स’बु’क बंद पडल्यामुळे मार्क जकरबर्ग यांना तब्बल एवढ्या करोडचे झाले नुकसान, वाचून थक्क व्हाल !

सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रात्री संपुर्ण जगभरात फेसबुक, व्हाट्सऐप आणि इंस्टाग्राम ही सोशल मिडीया माध्यमे ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक युजर्संना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. इतका वेळ ही तिन्ही माध्यमे बं असल्याने अनेकांना बैचनीसुद्धा आली. ही समस्या सोमवारी रात्री ९च्या सुमारास सुरु झाली. पण या सर्वांपलिकडे या सम़स्येमुळे सर्वात मोठे नुकसान कोणाचे झाले तर ते मार्क्स झुकरबर्गचे.

त्याचे या ६ तासांच्या कालावधीत 600 करोड़ डॉलर भारतीय मुद्रा नुसार तब्बल 4,47,34,83,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सेवा ठप्पच्या या कालावधीत श्रीमंतांच्या यादीत उच्च स्थानावर येणारे मार्क्स झुकरबर्ग यांचे स्थान आता एक स्थानाने कमी झाले असुन ते आता माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या मागच्या स्थानावर आले आहेत.

सध्या व्हॉटस् अप आणि इन्स्टाग्रामचा मालकी हक्क हा फेसबुक कडे आहे. शिवाय या तिन्ही माध्यमांच्या सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर फेसबुककडे यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या. त्यावर फेसबुक प्रवक्त्यांनी दिलगीरी व्यक्त करत सांगितले कि, सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे परंतु ही समस्या ठिक करण्याचे काम चालु असुन लवकरात लवकर सर्व पुर्ववत करण्याचा आम्ही प्रयत्न करु.

वापरकर्त्यांना होणाऱ्या असुविधेतेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो. मात्र कंपनीकडुन या समस्येचे कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही. इन्स्टाग्रामच्या अधिकृत हॅण्डल वर ट्विट करण्यात आले कि, इंन्स्टाग्राम पुर्ववत होण्यास आणखी काही कालावधीचा विलंब होत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना होणाऱ्या त्रासासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. आमच्यासोबत रहा. सेवा पुर्ववत करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत.

भारतात फेसबुकसोबतइतर सोशल मीडिया माध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या सरकारी आकड्यांनुसार भारतात ५३ करोड व्हॉटस् अप वापरकर्ते, ४१ करोड फेसबुक वापरकर्ते, आणि २१ करोड इन्स्टाग्राम वापरकर्ते आहेत.

सोमवारी सोशल मीडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये ४.९टक्के घसरण झाली. किंबहुना सप्टेंबरच्या मध्यापासुनच १५टक्के घसरण झाली होती. सोमवारी स्ट़ॉक मध्ये झालेल्या बदलानंतर झुकरबर्गची एकुण संपत्ती १२ हजार १६० करोड डॉलरवर आली. ब्लूमबर्गच्या सुचीत फेसबुक सीईओचे नाव आता बिल गेट्सच्या खालच्या स्थानावर गेले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !