जीवन म्हटले की चढउतार मानवी जीवनामध्ये येत असतात परंतु या सर्व संकटांवर आपल्याला मात करता आले पाहिजे. जर तुमच्या अंगी जिद्द,ध्येय स्फूर्ती आत्मविश्वास मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर सहजरीत्या मात करू शकता तसेच जीवनामध्ये प्रत्येक यश प्राप्त करू शकतात. अनेकदा आपल्याला खूप सारे स्वप्न पूर्ण करायचे असतात परंतु परिस्थितीमुळे ती करता येत नाही. आई-वडिलांची परिस्थिती तसेच गरीब घराण्यामध्ये जन्माला आलो असलो तरी सर्व यश प्राप्त करणे शक्य होत नाही परंतु जर तुमच्या अंगी काही करण्याची जिद्द असेल, ध्येय असेल तर तुम्ही नक्कीच उंच गगन भरारी घेऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्ति बद्दल सांगणार आहोत, या व्यक्तीने अनेक संकटे पार करून आपली ध्येय प्राप्त केले आहे. एकेकाळी त्याचे आई-वडील झोपडी मध्ये राहत होते. कच्चे घर असून देखील या मुलाने मेहनतीच्या जोरावर आज इतके नाव कमावले आहे, की या मुलाच्या मेहनतीमुळे आई-वडिलांना सोन्याचे दिवस आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. या मुलाचा जन्म नदी किनारी झालेला आणि घरामध्ये इतकी गरिबी होती की दोन वेळेचे अन्न देखील खायला मिळणे मुश्किल होते. जेव्हा या मुलाच्या घरी कोणी पाहुणे यायचे तर असे वाटायचे की आज आपल्याला काहीतरी चांगले खायला मिळेल परंतु पदरी असलेली निराशा ही कायमस्वरूपाची होती गरिबी ही पाचीला पुजलेली होती.
या व्यक्तीचे वडील झोपडीमध्ये राहायचे परंतु दुसऱ्यांसाठी बिल्डिंग बनवायचे कारण की या व्यक्तीचे वडील गवंडी होते आणि आई शेतामध्ये काम करायचे. पुस्तक खरेदी करण्यासाठी देखील पैसे यांच्याकडे नसायचे परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून या व्यक्तीने आज प्रशासकीय अधिकाऱ्याचे पद प्राप्त केलेले आहे म्हणूनच या व्यक्तीचे नाव आणि त्याचे पद अगदी वाखडण्याजोगे आहे. या व्यक्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे नाव आहे डीएसपी अधिकारी संतोष पटेल.
काही महिन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता, या व्हिडिओमध्ये डीएसपी अधिकारी शेतामध्ये आपल्या आईला भेटायला जातात. हो, अगदी खरच तुम्ही ओळखले ते बरोबर आहे..या अधिकाऱ्याचे नाव आहे डीएसपी संतोष पटेल. संतोष यांनी पाच वर्षांपूर्वी प्रचंड मेहनतीच्या जोरावर ही खाकी वर्दी मिळवली. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ग्वालियर पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले घाटी गाव येथील बंदोबस्तावर असलेले डेप्युटी सुप्रीटेंडेंट ऑफ पोलीस संतोष पटेल यांनी सांगितले की या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागला. संघर्ष ही व्याख्या काय असते, हे त्यांना या पदापर्यंत पोहोचताना कळाले आहे म्हणूनच आज जे काही सुवर्ण दिवस आलेले आहेत ते सारे संघर्षामुळे आलेले आहेत असे संतोष अगदी अभिमानाने सांगतात.
घरामध्ये दोन वेळचे अन्न शिजवायला मिळेल, यासाठी त्यांची आई शेतामध्ये मजुरी करायची आणि वडील गवंडी चे काम करायचे. संतोष ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी आजूबाजूला जंगल होते तसेच शेजारी नदी देखील होती म्हणूनच तेथे कोणत्याही प्रकारची शेती करणे शक्य नव्हते यासाठी संतोष यांच्या आईला गावापासून लांब शेतीमध्ये काम करायला जावे लागायचे.. आई आणि वडिलांच्या अथांग मेहनतीच्या जोरावर तसेच आशीर्वादाच्या जोरावर आज मी या पदावर बसलेलो आहे, असे देखील म्हणायला संतोष मागे हटत नाही.
डीएसपी संतोष यांनी रात्र दिवस एक करून संघर्ष केला आणि आपल्याला हवे असलेले पद प्राप्त केले त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले की जर तुमचे विचार आणि मेहनत प्रामाणिक असेल तर तुम्ही कोणतेही स्वप्न सहज पाहू शकता आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकता. जर तुमच्या अंगी फक्त जिद्द आणि चिकाटी असायला हवी हे दोन तत्व जर अंगी असेल तर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीच अडवू शकणार नाही, असा देखील सल्ला डीएसपी संतोष यांनी तरुण वर्गाला दिलेला आहे.