Headlines

पोस्टाची आत्तापर्यंतची सर्वात जबरदस्त योजना १५०० रुपये गुंतवा आणि मिळवा ३५ लाख रुपये, जाणून घ्या योजना !

पोस्टामध्ये पैसे गुंतवणे हे कधीही फायद्याचे आणि सुरक्षित मानले जाते कारण यात जोखीम कमी असते. तसेच पोस्टाच्या स्किममध्ये बॅंकांच्या तुलनेत जास्त पैसे परत मिळतात. आज तुम्हाला अशाच एका स्की’मबद्दल सांगणार आहोत.या स्किममध्ये तुम्ही दर महिन्याला १५०० रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर ३५ लाख रुपये मिळतील. ही पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना – पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना ही एक विमा योजना आहे, जी गावातील लोकांना लाभदायक ठरते. या योजनेअंतर्गत १९ते ५५ वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेत किमान 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. या योजनेचा प्रिमियम तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक भरू शकता. याशिवाय यामध्ये कर्ज घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे. परंतु कर्ज घेण्यासाठी पॉलिसी घेतल्यानंतर चार वर्षे वाट पहावी लागेल.

35 लाखांचा फंड कसा तयार होणार – समजा जर वयाच्या १९ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत 10 लाखांची पॉलिसी घ्यावी लागेल. ज्याचा मासिक प्रीमियम १५१५ रुपये असेल, तो तुम्ही दरमहा गुंतवू शकता. वयाच्या ५५ ​​व्या वर्षी तुम्हाला ३१.६० लाख रुपयांचा मॅ’च्यु’रि’टी फायदा मिळेल. त्याचप्रमाणे, वयाच्या ५८ वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास, मॅच्युरिटी बेनिफिट ३३.४० लाख रुपये होईल, ज्यांचे मासिक पेन्शन १४६३ असेल तर ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपयांसाठी तुम्हाला १४११ रुपयांचा प्रीमियम मिळेल.

ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI)ही योजना 1995 मध्ये भारत राहणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण जनतेला सर्वसाधारणपणे विमा संरक्षण प्रदान करणे आणि ग्रामीण भागातील दु’र्ब’ल घटकांना आणि महिला कामगारांना विशेष लाभ मिळवून देणे आणि ग्रामीण लोकांमध्ये विमा जागरूकता निर्माण करणे हा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !