तुम्हाला जर तुमची सेव्हिंग सुरक्षित ठेवुन त्यावर चांगला नफा कमावायचा असेल तर पोस्टात फिक्स डिपोझिट हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. पोस्टात एफडी केल्यावर काही खास सुविधा मिळतात. तसेच पोस्टात पैसे सुरक्षित राहतात याची खात्रा खुद्द सरकारकडुन देखील मिळते. बॅंकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. आता बॅकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या एफडीवर आता जास्त व्याज मिळत आहे. सध्या बॅकेतुन फिक्स डिपॉजिटवर जास्तीत जास्त ६.५० टक्के व्याज वरिष्ठ नागरिकांना मिळतो.
पोस्टात एफडी करण्याचे फायदे – पोस्टात एफडी करण्याची भारत सरकार गॅरेंटी देते. यात गुंतवणुक केल्यास पैसे पुर्णपणे सुरक्षित राहतात. पोस्टात नेंट बॅंकिंग किंवा मोबाईल बॅंकिंग मधुन एफ डी करण्याची सोय आहे. पोस्टात तुम्ही एकाहुन जास्त एफडी करु शकता. तुमचे एफडी अकाउंट जॉइंट करु शकता. पोस्टात जर तुम्ही ५ वर्षांसाठी एफडी करता तर आईआरटी फाइल करते वेळी टॅक्समध्ये सुट मिळते. या एफ डी एका पोस्टमधुन दुसऱ्या पोस्टात ट्रान्सफर करता येते. चेक किंवा कॅश देऊन खाते उघडले जाऊ शकते.
पोस्टातील एफडीसाठी चेक किंवा कॅश देता येते. कमीत कमी १००० रुपयांमध्ये खाते उघडले जाऊ शकते. तर अधिकाधिक पैसे भरण्यासाठी कोणतेही बंधन नाही. पोस्टाच्या एफडीवर ६.७० टक्के व्याज.
पोस्टाच्या ७ दिवसांपासुन ते एका वर्षापर्यंतच्या एफडीवर ५.५० टक्के व्याज मिळते. २ आणि ३ वर्षांच्या एफडी साठी पण ५.५० टक्के व्याज द्यावा लागतो. तर ३ वर्षे एक दिवसापासुन ते ५ वर्षांपर्यंतच्या एफडिवर ६.७० टक्के व्याज मिळतो.
अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी सुविधा या व्यतिरिक्त ग्राहकांना अकाउंट ट्रान्सफर करण्याची सुद्धा सुविधा मिळते. तसेच नॉमिनी जोडण्याची किंवा बदलण्याची सुद्धा सुविधा आहे. खाते उघडल्यानंतर तुम्हाला ही सुविधा चालु होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !