Headlines

फक्त २५ हजारांने सुरु करा हा व्यवसाय आणि मिळवा तब्बल १.४० लाख निश्चित नफा, जाणून घ्या कसा सुरु करायचा हा व्यवसाय !

स्वतःचा व्यवसाय असावा असं अनेकांचं स्वप्न असतं. काही जण ते पूर्ण करतात, पण काही भांडवल नसल्याने शांत राहतात. पण जर तुम्ही ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचारात आहेत तर अप्लायसाठी एक जबरदस्त कल्पना आम्ही घेऊन आलो आहोत. ज्याची सुरुवात कमी पैशात करू शकता आणि मोठी कमाई देखील करू शकता.

तुम्ही पोहे उत्पादन युनिट उभारू शकता, हा चांगला व्यवसाय आहे. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. पोह्यांचा समावेश बहुतांशी नाश्त्यामध्ये केला जातो. हे बनवायला आणि पचायला देखील सोपे असतात. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या प्रकल्प प्रोफाइल अहवालानुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रकल्पाची किंमत सुमारे २.४३ लाख रुपये आहे आणि सरकार तुम्हाला ९०% पर्यंत कर्ज देखील देईल. म्हणजेच तुम्ही स्वतःहून फक्त २५ हजार रुपये घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.

KVIC च्या अहवालानुसार, हा व्यवसाय फक्त २.४३ लाख रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू केला जाऊ शकतो. तुम्ही हे युनिट सुमारे ५०० चौरस फूट जागेत स्थापित करू शकता. यावर तुम्हाला १ लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर पोहे मशिन, चाळणी, भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम इत्यादींवर तुम्ही १ लाख रुपये खर्च कराल. अशा प्रकारे, तुमचा एकूण खर्च २ लाख रुपये होईल, तर केवळ ४३ हजार रुपये खेळते भांडवल म्हणून खर्च केले जातील.

प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला सुमारे ६ लाख रुपये खर्च येईल. याशिवाय तुम्हाला सुमारे ५० हजार रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही सुमारे १००० क्विंटल पोहे तयार कराल. ज्यावर उत्पादन खर्च ८.६० लाख रुपये येईल. तुम्ही १००० क्विंटल पोहे सुमारे १० लाख रुपयांना विकू शकता. म्हणजेच तुम्ही जवळपास १.४० लाख रुपये कमवू शकता.

KVIC च्या या अहवालानुसार, जर तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे ९० टक्के कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !