Headlines

आपल्या साध्या टीव्हीला बनवा स्मार्ट टीव्ही, फक्त करा ही सहजसोपी गोष्ट !

तंत्रज्ञानातील बदलाचा परिणाम हळू हळू सगळीकडेच होताना दिसत आहे. मोबाईलमध्ये होत गेलेली प्रगती तर आपण पाहतोच आहोत. हल्ली असे काही स्वतंत्र सॉफ्टवेअर्स बनवले गेले आहेत, ज्यांच्या वापराने आपला काम अधिक सोपं होताना दिसत आहे. तर आपल्या मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी फार पूर्वीपासून वापरला जाणार साधन म्हणजे टीव्ही.

सुरुवातीला हा टीव्ही कृष्ण – धवल होता आणि मोजकेच कार्यक्रम या टीव्हीवर प्रदर्शित केले जात असत. सुरुवातीला टीव्हीसाठी अँटिना असण्याची गरज असे. मग थोडी प्रगती झाली आणि रंगीत टीव्ही बाजारात आले. थोड्या काळानंतर अँटिनाची जागा केबल वायर्सने घेतली.

आधी एखाद्या डब्यासारखे दिसणारे टीव्ही आता फ्लॅट स्क्रीन असलेले सोबतच ते भिंतीवर लावून बघू शकणारे आले. या केबल वायर्सची जागा सध्या सेटअप बॉक्स आणि रिचार्जने घेतली आहे. हल्ली स्मार्ट टीव्हीचं व बिग स्क्रीन असेलेल्या टीव्हीचं प्रस्थ वाढलं आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक वेगवगेल फीचर्स असतात. ह्या स्मार्ट टीव्हीला आपण आपल्या अँड्रॉइड फोनशी कनेक्ट करून वापरू शकतो. तर आपल्याकडे असलेल्या साध्या टीव्हीला देखील एका डिव्हाईसच्या माध्यमातून आपण स्मार्ट टीव्हीमध्ये कॉन्व्हर्ट करू शकतो. चला तर पाहूया हि प्रक्रिया.

साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका डिव्हाईसची गरज लागते. या डिव्हाईसच नाव आहे chrome cast (TV screening device by Google). हे डिव्हाईस ऑनलाइन ऑर्डर करून देखील मिळू शकत वा दुकानांमध्ये देखील हे उपलब्ध आहे. याची किंमत १००० ते १२०० इतकी आहे. हे डिव्हाईस आपल्या टीव्हीला वायफाय कनेक्टिव्हिटी देतं.

जस आपण एखाद्या फोनला कनेक्ट करतो तसं हे डिव्हाईस आपल्या टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टल कनेक्ट करायचा, यासोबत एक यूएसबी देखील कनेक्टेड दिली असते, ती यूएसबी तुमच्या टीव्हीच्या युएसबी पोर्टल कनेक्ट करायची. अशाप्रकारे सगळं कनेक्ट करून झाल्यानंतर टीव्ही ऑन करावा. टीव्ही सुरु केल्यावर इनपुट लिस्टमध्ये जाऊन एचडीएमआयचा ऑप्शन निवडावा. या ऑप्शननंतर स्क्रीनवर डिव्हाईसच नाव आणि पासवर्ड समोर दिसतो.

यानंतर ज्या फोनसोबत आपल्याला कनेक्ट करायचं आहे, त्या फोनचा वायफाय सुरु करावा आणि तिथे येणाऱ्या डिव्हाईसच्या नावाशी कनेक्ट करायचं आहे. यानंतर प्रत्येक अँड्रॉइड फोनमध्ये एक स्मार्ट मिररिंग असा ऑप्शन असतो. तो शोधून स्मार्ट मिररिंग ऑन करायचं आहे, त्यानंतर खाली डिवाइसच नाव येत., त्यासोबत कनेक्ट करावं.

त्यानंतर टीव्हीवर देखील हे कनेक्ट होत असल्याचं दाखवलं जातं आणि यानंतर आपण जे काही अँप वापरणार ते मोबाईल स्क्रीनवर ज्याप्रमाणे दिसणार तसेच ते टीव्हीवर देखील दिसेल. अशारितीने तुमचा साधा टीव्ही हा एक स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही होतो.

टीप – सर्व बदल हे तज्ञ् व्यक्तीच्या निदर्शनाखाली करा, आम्ही तुमच्या नुकसानीस जवाबदार राहणार नाही. सर्व गोष्टी तुमच्या जबाबदारीवर करा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !