Headlines

सुकन्या समृद्धी योजनेत आपल्या मुलीचे खाते उघडले आहे तर आता मिळेल हा मोठा फायदा !

मुलींसाठी केंद्रसरकारने चालु केलेली सुकन्या समृद्धी योजना खुप प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलीच्या शिक्षणाचे किंवा तिच्या लग्नाची चिंता असेल तर तुम्हाला या सरकारी योजनेचे खुप फायदा होईल. मुलीच्या जन्मापासुन ते ती १० वर्षांची होईपर्यंत या योजनेत खाते उघडता येते. यामध्ये सरकार कडुन व्याजपण मिळते. तसेच त्याच ऑनलाइन सुद्धा पैसे ट्रान्सफर करता येतात. त्यासाठी खाते ज्या दिवशी उघडतो तेव्हा पासुन २१ वर्षांनी किंवा १८ वर्ष झाल्यावर तिच्या लग्नाच्या वेळी (लग्न तारखेच्या एक महिना आधी किंवा तीन महिन्यांनंतर) सुकन्या समृ़द्धी खाते मॅच्युर होते.

पोस्ट पेमेंट बॅंक मार्फत पैसे जमा करु शकता – इंडिया पोस्ट पेमेंट बँक हि अशी एक सुविधा आहे ज्यामध्ये इतर मोठ्या बँकांच्या तुलनेत छोटे व्यवहार केले जातात. या पेमेंट बँकेमार्फत सर्व बँकिंग संबंधित कामे, कर्ज आणि क्रेडिट कार्ड वगळता; आपण बँकेत पैसे जमा करू शकता, आणि आपण एखाद्या नातेवाईकाला पैसे देखील पाठवू शकता. तुम्ही पोस्ट पेमेंट खात्यातुन सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्जदार त्यांच्या मुलीचे खाते कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडु शकता.

किती व्याज मिळते – सुकन्या समृद्धी योजनेमध्ये ७.६ टक्के वार्षिक व्याज मिळते. केंद्र सरकार कडुन दर तीन महिन्यांनी ते व्याजदर रिवाइज होत असतात. त्यात अनेक स्मॉल सेविंग्स स्कीम चा सहभाग आहे. याव्यतिरीक्त या योजनेत ग्राहकांना टॅक्समध्ये सुद्धा सुट मिळते.

किती पैसे डिपॉझिट करावे लागतात – या योजनेत कमीत कमी २५० रुपये डिपॉझिट करावे लागतात. तर जास्तीत जास्त १,५०,००० रुपये डिपॉझिट करता येतात. या योजनेत खाते उघडल्यास तुमच्या मुलीचे शिक्षण आणि भविष्यात होणाऱ्या खर्चाची काळजी कमी होण्यास मदत होईल.

IPPB अॅप मार्फत सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करा,  यासाठी तुम्हाला तुमचे सेव्हींग अकाउंट IPPB अकाउंटशी सलग्न करावे लागेल. त्यानंतर DOP Product मध्ये जावे. त्यात गेल्यावर सुकन्या योजना अकाउंटला सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला SSY अकाउंट नंबर आणि DOP कस्टमर आईडी एंटर करावे लागेल. आता तुम्हाला तिथे तुमच्या हफ्त्यांचा कालावधी व रक्कम सिलेक्ट करावी लागेल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर तुम्हाला IPPB च्या नोटीफिकेशन कडुन माहिती दिली जाते.

या डॉक्युमेंटसची गरज लागेल – सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्मसोबत पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत तुमच्या मुलीचे बर्थ सर्टिफिकेट जमा करावे लागेल. या व्यतिरिक्त मुलगी आणि तिच्या आई वडिला्ंचे ओळख पत्र (पैन कार्ड, राशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट) आणि तुम्ही जिथे राहता तेथील प्रमाण पत्र (पासपोर्ट, राशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल, पाण्याचे बिल) जमा करावे लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !