Headlines

भारतातील या गावात नव्या नवरीला ५ दिवस राहावे लागते नि*व*स्त्र, जाणून घ्या का ?

विभन्नतेत एकता हे भारताचे ब्रिद वाक्य आहे. भारतात प्रत्येक गावागावानुसार किंवा शहरांनुसार तिथली भाषा, रितीरिवाज, परंपरा, राहणीमान या गोष्टी बदलल्या जातात. त्यातील काही परंपरांमध्ये आजदेखील अंधश्रद्धा बाळगल्या जातात. तर काही प्रथा परंपरा इतक्या विचित्र असतात कि त्यावर आपण विश्वास पण ठेवु शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रथे बद्दल माहिती देणार आहोत जी हिमालयातील मणिकर्ण घाटीच्या पीणी गावांत आज देखील पाळली जाते.

हिमाचल प्रदेशच्या या पीणी गावांत एक खुपच विचित्र अशी प्रथा आहे ती म्हणजे तेथील महिला या वर्षातील ५ दिवस कपडे परिधान करत नाहीत. एवढेच नव्हे तर या ५ दिवसांत त्या त्यांच्या पतीशी बोलु सुद्धा शकत नाही किंवा त्यांच्याशी मजा मस्करी सुद्धा करु शकत नाही. ही विचित्र प्रथा तेथे श्रावण महिन्यात पाळली जाते. या महिन्यातले ५ दिवस तेथील महिला निवस्त्र राहतात.

प्रथा न पाळल्यास घडते अशुभ – असे म्हटले जाते कि जर एखाद्या महिलेने ही प्रथा पाळली नाही तर तिच्या घरी काहीतरी अशुभ घटना घडते. किंवा एखादी वाईट बातमी ऐकण्यास मिळते. त्यामुळे आपल्या घरात असे वाईटसाईट काही घडु नये यासाठी त्या ही विचित्र प्रथा पाळतातच. मात्र काळानुरुप या प्रथेत काही बदल सुद्धा झाले आहेत. पुर्वी त्या काळात महिलेला शरीरावर एकपण कपडा परिधान करण्याची अनुमती नसायची. पण आता तेथील महिला त्या ५ दिवसांत लोकरीचा पातळ कपडा घालतात. त्या कपड्याला पट्टु असे म्हणतात.

ही आहे यामागील कथा – असे म्हटले जाते की खुप वर्षांपुर्वी त्या गावात एक रा*क्ष*स यायचा. तो रा*क्ष*स त्या गावातील सुंदर कपडे परिधान करणाऱ्या महिलांना घेऊन जायचा. त्या रा*क्ष*सा*चा लाहुआ देवतेने अंत केला. तेथील लोकांचा समज आहे की आज देखील ती देवता त्या गावात येते आणि वाईट शक्तींचा अंत करते. या घटनेनंतरच त्या गावात या प्रथेला सुरुवात केली गेली आणि तेथील महिलांनी श्रावण महिन्यातील ५ दिवस कपडे घालणे सोडले.

या पीणी गावातील लोक ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या भादो संक्रातीला काळा महिना असे म्हणतात. तेथील महिला त्या महिन्यात ५ दिवस कोणतेही कपडे घालत नाहीतच शिवाय कोणत्याही उत्सवातसुद्धा सहभागी होऊ शकत नाही. त्या काळात त्यांना हसण्याची सुद्धा परवानगी नसते. शिवाय त्यांच्या पतिंना देखील पत्नीपासुन दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी असे न केल्यास त्यांच्या घरात काहीही अघटित घडु शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !