Headlines

एकमेकांच्या सवती बनायला आहेत तयार, शोधत आहेत एकच पती, बघा काय कारण आहे नक्की !

असं म्हणतात की एखादी मुलगी किंवा स्त्री ही सर्व काही सहन करु शकते मात्र ती तिचे प्रेम कोणाशी वाटुन घेऊ शकत नाही. त्यामुळेच सवत या एकमेकींच्या शत्रु असल्यासारख्या वावरतात. त्यांच्यात कधीच एकमेकांप्रति प्रेम भावना नसते. कधीच दोन मुली या एकमेकींच्या सवत बनु इच्छित नाही पण हे जग खुपच निराळे आहे. इथे कधी काय घडेल याचा पत्ता लागत नाही.

सध्या एक असे प्रकरण समोर आले आहे ज्यात दोन मुस्लिम बायका एकमेकींच्या सवत बनायला तयार आहेत. त्या त्यांच्यासाठी एकाच पतीचा शोध घेत आहेत. आता त्या सवत का बनु इच्छितात आणि त्यांना दोघात मिळुन एकच पती का हवा आहे याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मलेशियाच्या आहेत दोन मुली – एखादी मुलगी तिच्या पतीला दुसरीसोबत शेअर करेल असे फार कमी घडते. कधी कधी पतिचे बाहेर परस्त्री सोबत अफेअर असेल तर बिचाऱ्या त्याच्या पहिल्या बायकोला काही वेळेस मुग गिळुन शांत रहावे लागते. त्यावेळी मजबुरी खातर मुलगी काही बोलत नाही पण मनातुन ती फार दुखी असते. पण याला अपवाद मलेशियातील दोन मुली ठरल्या आहेत. या दोन मुलींना त्यांचा पती एकमेकांशी शेअर करायचा आहे. त्यामुळे त्या अशा मुलाच्या शोधात आहे जो त्या दोघींशी ही लग्न करेल.

फेसबुक पोस्ट द्वारे व्यक्त केली इच्छा – या दोन मुलींनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे जी वेगात व्हायरल झाली आहे. यातील एकीचे वय ३१ असुन ती सिंगल मदर आहे तर दुसरीचे वय २७ असुन तिचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. दोघांनी एका पोस्ट मार्फत एकाच व्यक्तीशी लग्न करण्य़ाची इच्छा व्यक्त केली आहे. व त्या खुशीने एकत्र राहतील असे सांगितले आहे. त्यांनी म्हटले कोणाला जर आम्हाला एकत्र पत्नी म्हणुन स्विकारायचे नसेल तर काही हरकत नाही आम्ही ही पोस्ट सोशल मीडियावर आमचे नशिब आजमवण्यासाठी करत आहोत. आम्हाला दोघींना एकत्र स्विकारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

हे आहे एकच पती हवा असल्या मागचे कारण – या दोन्ही मुलींची मैत्री खुप घनिष्ट आहे. त्यामुळे त्यांना एकमेकींची साथ सोडायची नाही. त्यांच्या मैत्री खातर त्यांना एकाच व्यक्तीसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. पण त्यांची ही इच्छा त्यांच्यासाठी अडचण बनली आहे. सोशल मीडियावर दोघांना खुप ट्रोल केले जात आहे. एका युजरने लिहीले कि तुमच्या अशा इच्छे मुळे तुम्ही मुलींना बदनाम करत आहात. तर एकाने लिहीले की तुम्ही दोघीही खुप सुंदर आहात पण तुमच्यात आत्मसन्मान नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !