Headlines

सलग दोन महिने नवरी सुहागरातच करून देत नव्हती, पण नवऱ्याने नंतर जे पाहिलं ते भीतीदायक होतं !

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न ही फार महत्त्वाची गोष्ट असते. काही जण तर त्यांच्या बालपणापासूनच लग्नाची स्वप्न पाहत असतात. आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याचे अंधूक चित्र प्रत्येकाच्या मनात तयार झालेले असते. त्यामुळे तशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. लग्न म्हटले की शारीरिक संबंध हे आलेच. याबाबतीत मुले जरा अतिउत्साही असतात. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री आपण काय काय करावे याची स्वप्ने ते लग्न आधीपासूनच पाहत असतात. पण समजा लग्नानंतर वधुने तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर… बिचार्‍या त्या त्या मुलाचे काय हालत होईल! त्या मुलाचा च्या मनात त्याच्या पत्नी विषयी नानाविविध प्रश्न तयार होतील.

असेच काहीसे उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडले. कानपूर मधील एका नव्या नवरीने तिच्या पतीसोबत एक दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ती कोणते ना कोणते कारण काढून सतत तिच्या पतीला टाळायची. सततच्या नकारामुळे जेव्हा पतीच्या मनात त्याच्या पत्नी विषयी संशय निर्माण झाला त्यावेळेस त्याने या प्रकरणाची पडताळणी करायचे ठरवले. त्यानंतर जे सत्य समोर आले त्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते झाले. सर्व प्रकरणाची खरी माहिती मिळताच नवरदेवाने थेट पोलीस स्टेशन गाठले अन् त्याची पत्नी आणि सासरकडच्या आठ लोकांविरोधात एफ आय आर नोंदवली.

कानपूरच्या शास्त्री नगर येथे राहणाऱ्या एका इसमाचे पनकी येथे राहणाऱ्या एका महिले सोबत लग्न थाटामाटात झाले होते. लग्नात वधू वर खूप खुश होते मात्र जेव्हा शारीरिक संबंध ठेवण्याची वेळ आली त्यावेळेस त्या इसमाच्या पत्नीने तब्येत खराब असल्याचा बहाणा केला व मी आता शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे तिच्या पतीला सांगितले. त्यादिवशी त्या इसमाने त्याच्या पत्नीचे ऐकले. असे बघता बघता दोन महिने उलटून गेले पण पत्नी सतत आजारी असल्याचे कारण देत संबंध ठेवण्यास नकार देत होती.

पत्नीच्या अशा वागण्यामुळे नक्कीच काहीतरी काळबेर आहे असे पतीला जाणवू लागले. त्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला स्त्री रोग विशेषज्ञ कडे तपासण्यास नेले. त्यावेळी डॉक्टरने सांगितले की त्या इसमाची पत्नी ही महिला नसून एक ट्रान्सजेंडर आहे. ही गोष्ट ऐकून त्या इसमाच्या पायाखालची जमीन सरकली.

त्याची एवढी मोठी फसवणूक केल्याबद्दल त्याने पत्नी, सासू-सासरे आणि मध्यास्था विरोधात कलम ४२० अंतर्गत एफ आय आर नोंदवली. तसेच पुरावे म्हणून त्याने पोलिसांकडे पत्नीचे मेडिकल रिपोर्ट दिले. अशी माहिती पोलीस ठाणा प्रमुख कुंजबिहारी मिश्रा यांनी दिली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !