Headlines

स्वस्तात घर खरेदी करण्याची अजुन एक सुवर्ण संधी….. पीएनबी बँक विकत आहे ३६८१ घरं, जाणून घ्या !

छोटे का असेना पण स्वत:चे एकतरी घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण सध्या घरांच्या किंमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत कि घर घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक नामी संधी चालुन आली आहे. तुम्हालापण जर स्वस्तात घर खरेजदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

पंजाब नॅशनल बॅंक त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करत आहे. यामध्ये रेसिडेंशियल, कॉमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा तीनही प्रॉपर्टीचा समावेश आहे. त्यामुळे येथे तुम्ही कमा पैशांत तुमचे घर खरेदी करु शकता. बॅंकेची ही प्रॉपर्टी डिफोल्ट लिस्टमध्ये आली आहे. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information)ने दिली.

बॅंक वेळोवेळी करते लिलाव – ज्या ज्या प्रोपर्टीचे मालक त्यांचे लोन कोणत्याही कारणास्तव वेळेत फेडत नाही अशा लोकांची प्रॉपर्टी बॅंक त्यांच्या ताब्यात घेते. त्यानंतर कालांतराने वेळोवेळी या प्रॉपर्टीची लिलाव केला जातो. ही प्रॉपर्टी विकुन बॅंक त्यांचे लोनचे पैसे वसुल करुन घेते.

पीएनबी बॅंकने ट्विट करुन दिली माहिती – पीएनबी बॅंकने त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवरुन यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये त्यांनी लिहीले आहे की निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा इ-लिलाव २९ डिसेंबर २०२० ला केला जाईल. येथे तुम्ही योग्य भावात प्रॉपर्टी खरेदी करु शकता.

केवढी आहे प्रॉपर्टी – यावेळी ३६८१ रेसिडेंशियल प्रॉपर्टी आहे तर ९६१ कॉमर्शियल प्रॉपर्टी ,५२७ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी , ७ एग्रीकल्चर प्रॉपर्टी इतक्या जागांचा लिलाव बॅंकेकडुन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा – प्रॉपर्टीच्या लिलावा संदर्भात अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करुन माहिती मिळवु शकता. – https://ibapi.in/

बॅंकेने लिलावासाठी जाहिर केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये मालमत्ता, जागा, मोजमोप, भाडेपट्टी या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. ई-लिलावाद्वारे तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन त्यासंबधी प्रक्रिया व मालमत्तेची माहिती घेऊ शकता. २९ डिसेंबर रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !