Headlines

मंगळवारी या कारणामुळे हनुमानाला शेंदुर चढवला जातो, कारण जाणून तुम्हीच हनुमानाला शेंदूर लावाल !

महाबली हनुमान नेहमीच त्याच्या भक्तांवर येणारे संकट अडीअडचणी दूर करत असतो. असे म्हणतात हनुमान त्याच्या भक्तांवर लगेच प्रसन्न होणारी देवता आहे. हनुमानाला प्रसन्न करायचे असल्यास जास्त काही करण्याची गरज भासत नाही. मंगळवारी हनुमानाची यथार्थ पुजा केल्यावर अमृतवाणी आणि श्री हनुमान चालीसाचा पाठ वाचल्यावर हनुमान खुष होतो आणि त्याच्या भक्ताच्या सर्व इच्छा पुर्ण करतो.

हिंदु धर्मात शेंदुराला विशेष महत्व आहे. विवाहित महिला डोक्यावर कुंकु लावतात तसेच पुजापाठातसुद्धा शेंदुराचा वापर केला जातो. देवदेवतांना शेंदुराचा टिळा लावला जातो. त्याचप्रमाणे हनुमानाला सुद्धा शेंदुर चढवला जातो. मात्र त्यापाठी एक विशिष्ठ कारण असते. चला तर जाणुन घेऊ हनुमानाला मंगळवारी शेंदुर का चढवला जातो !

रामचरीत्र मानसानुसार चौदा वर्षांचा वनवास पुर्ण करुन जेव्हा श्री राम, सीता आणि लक्ष्मण पुन्हा आयोध्येला गेले त्यावेळी हनुमानाने सीता मातेला तिच्या कपाळावर कुंकू लावताना पाहिले. हनुमानाला ते थोडे विचित्र वाटले म्हणुन त्यांनी त्याबद्दल सीतेला विचारले. यावर सीतेने सांगितले कि मी कपाळावर कुंकू लावले तर मला श्रीरामाचे स्नेह प्राप्त होईल तसेच त्यांना दिर्घ आयुसुद्धा लाभेल.

कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक असते. हे सर्व ऐकल्यावर रामाचा सच्चा भक्त असलेल्या हनुमानाने त्याच्या संपुर्ण शरीराला शेंदुर फासुन घेतले. यामागे हनुमानाचा भाबडा हेतु होता की जर त्याने कपाळा ऐवजी संपुर्ण शरीराला शेंदुर लावले तर त्याला भगवान श्री रामाचे खुप प्रेम मिळेल शिवाय त्याच्या प्रभुंना दिर्घ आयुष्य सुद्धा लाभेल. त्यानंतर हनुमान तसाच रामाच्या सभामंडपात गेला. हनुमानाला तशा अवतारात पाहुन रामाने त्यामागील कारण विचारले. तेव्हा हनुमानानेसुद्धा मी तुमचे प्रेम प्राप्त करण्यासाठी व तुम्हाला दिर्घ आयुष्य मिळावे यासाठी हे सर्व केले असे सांगितले.

हनुमानाचे उत्तर व त्याची निरागसता पाहुन श्रीरामाला अत्यानंद झाला व त्यांनी प्रेमाने हनुमानाला मिठी मारली. तेव्हापासुनच हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी शेंदुर चढवला जातो. त्यामुळे हनुमानाचे तेज वाढते. शिवाय त्याच्या प्रति त्याच्या भक्तांच्या मनात आस्था देखील वाढते.

शेंदुर चढवताना या मंत्राचे पठण करा – तुम्ही जर हनुमानाच्या प्रतिमेवर शेंदुर चढवत असाल तर सर्वप्रथम त्या प्रतिमेला पाण्याने स्नान घाला. त्यानंतर त्या प्रतिमेला सर्व पुजा सामग्री अर्पण करा. त्यानंतर मंत्र पठण करुन चमेलीच्या तेलात शेंदुर मिसळुन किंवा प्रतिमेला हलकेसे तुप लावुन त्यावर शेंदुर लावावा.

मंत्र – सिन्दूरं रक्तवर्णं च सिन्दूरतिलकप्रिये। भक्तयां दत्तं मया देव सिन्दूरं प्रतिगृह्यताम।। एखादी इच्छा पुर्ण करुन घ्यायची असल्यास किंवा हनुमानाला प्रसन्न करुन घ्यायचे असेल तेव्हा हनुमानावर शेंदुर चढवला जातो. तसेच जर शनिची साडेसाती पाठी लागली असेल तर शनिवारी शेंदुर चढवला जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.