Headlines

चांगली बातमी – भारतात कोरोना वरील औषध पूर्ण टेस्टिंग सह तयार, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. या कोरोनाचा प्रभाव इतका वाढला आहे की व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन ते कमी करते व त्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. कोरोनाचा विळखा गेल्या काही दिवसात इतका जबरदस्त बसला की राज्यामध्ये अक्षरशः रुग्णांसाठी बेड व ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली. ऑक्सिजनविना व उपचाराविना लोकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. लसीकरण देखील राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

या सर्व दरम्यान ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DRDO)ने एक दिलासादायक माहिती दिली, कोरोनाच्या आपत्कालीन उपचारासाठी अजून एका औषधाच्या त्वरित वापरासाठी मान्यता मान्यता देण्यात आली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन एंड अलायड साइंसेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी मिळून तयार केली आहे.

या औषधाला आता 2-deoxy-D-glucose (2-DG) हे नाव दिले आहे आणि हे औषध बनवण्याची जबाबदारी हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीला दिली आहे. शनिवारी जारी केलेल्या निवेदनात, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आदेशानुसार मध्यम ते गंभीर कोरोनाच्या रूग्णांसाठी हे औषध उपचारासाठी तातडीने वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, एक सामान्य रेणू आणि ग्लूकोजचे अॅनलॉग असल्याने ते सहजपणे तयार केले जाऊ शकते आणि देशातही भरपूर प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. आणि देशाची लागणारी गरज पूर्ण केली जाऊ शकते.

कोरोनाच्या उपचारासाठी मान्यता मिळालेलं हे औषध पाऊच ( पुडी ) स्वरुपात येतं, जे पाण्यामध्ये मिसळून प्यायचे आहे. हे विषाणू संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवून व्हायरस वाढीस प्रतिबंधित करते. विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध अद्वितीय बनवते.

वरील औषध हे वैदकीय चाचणीमध्ये देखील यशस्वी झालं आहे. ज्या रुग्णांवर या औषधाची चाचणी केली ते रुग्ण लवकर ठीक होताना दिसले आणि सोबतच त्यांना ऑक्सिजनची गरज ही कमी भासू लागली. सोबतच या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रूग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येत होता. म्हणजेच फक्त हे औषध ऑक्सिजनची मात्रा भरून काढून नव्हते तर तो रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून लवकर बाहेर देखील येत होता.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये ह्या औषधावर लॅबमध्ये प्रयोग केला होता. या प्रयोगादरम्यान हा निष्कर्ष आला होता की हे औषध वाढत्या कोरोना विषाणूल आळा घालण्यासाठी मदत करू शकते. या निष्कर्षाच्या आधारावर डीसीजीआयने मे २०२० ला दुसर्‍या फेजमधील चाचणीसाठी मान्यता दिली होती.

वैधकीय चाचण्यांमधील निष्कर्षदुसरी फेज : देशातील विविध रुग्णालयांमध्ये या औषधाची चाचणी केली गेली. दुसरी फेज a ची चाचणी ६ तर दुसरी फेज b ची चाचणी ११ रुग्णालयांमध्ये केली गेली. ज्यामध्ये एकूण ११० रुग्णांचा समावेश होता. ही चाचणी मे ते ऑक्टोबरच्या दरम्यान केली गेली होती.
निष्कर्ष : ज्या रुग्णांवर या औषधाची चाचणी केली गेली, ते रूग्णांच्या तुलनेत २.५ दिवस आधी बरे झाले.

तिसरी फेज : देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान तिसर्‍या फेजची चाचणी केली गेली. यावेळेस या चाचणीमध्ये २२० रुग्ण सामील होते. ही चाचणी देशातील दिल्ली, उत्तरप्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू अशा विविध राज्यात केली.

निष्कर्ष : ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले, त्यांच्यापैकी ४२% रुग्णांना तिसर्‍याच दिवशी ऑक्सिजनची गरज पडेनाशी झाली. तथापि, ३१% रुग्णांना ज्यांना हे औषध दिले नव्हते त्यांची ऑक्सिजनवरची अवलंबता कमी झाली. म्हणजेच या औषधाच्या वापरणे ऑक्सिजनची कमतरता भरून निघाली. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये देखील समान निष्कर्ष दिसला. अशारीतीने या औषधाच्या चाचण्या होत 2-deoxy-D-glucose (2-DG) या औषधाला मान्यता मिळाली आहे.

References – https://www.thehindu.com/news/national/dcgi-approves-anti-covid-drug-developed-by-drdo-for-emergency-use/article34513900.ece , https://www.zeebiz.com/hindi/india/drugs-controller-general-of-india-dcgi-has-approved-the-emergency-use-of-drug-2-deoxy-d-glucose-2-dg-developed-by-drdo-47647, https://www.aajtak.in/coronavirus/story/dcgi-approves-anti-covid-drug-developed-by-drdo-for-emergency-use-1251374-2021-05-08, https://www.livemint.com/news/india/inmas-develops-anti-covid-therapeutic-application-of-2-deoxy-d-glucose-drug-11620465551911.html