चहा म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा भाग. अनेकांची तर चहा पियाल्याशिवाय सकाळच होतं नाही म्हणे. चहामुळे स्तुती उडून काम करण्यात तरतरी येते त्यामुळे अनेकदा ऑफिसमध्ये वगैरे काम करत असताना आपण दिवसातून २-३ वेळेस चहा घेतो. घरी किंवा ऑफिसमध्ये असताना तर काचेचे काप व स्टीलचे काप आपण चहा पिण्यासाठी वापरतो.
पण अगदीच आपण कुठे बाहेर गेलो की, प्लॅस्टिक व पेपर कपमध्ये चहा घेतो. प्लॅस्टिकचे कप शरीराला घटक असल्यामुळे आपण हल्ली पेपर कप वापरण्यास सुरुवात केली आहे, पण या पेपर कपमधील चहा सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो.
खड्गपूर येथील आयआयटी वैज्ञानिकांनी जो खुलासा केला आहे त्याप्रमाणे, जर एखादी व्यक्ती दिवसभरात ३ ते ४ वेळेस चहा किंवा कॉफी पीत असेल तर ती व्यक्ती ७५,००० अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण खातो. संशोधनाच्या माध्यमातून हि गोष्ट सिद्ध झाली आहे कि, या पेपर कपचे वरील आवरण तयार करण्यासाठी सूक्ष्म प्लॅस्टिक आणि इतर अयोग्य घटकांचा वापर करण्यात येतो आणि यामध्ये जर गरम पेय टाकले तर त्या पदार्थात त्याचे दूषित कण समाविष्ट होतात.
पेय पदार्थांच्या सेवनासाठी डिस्पोसेबल पेपर कप उत्तम पर्याय म्हणून पुढे आला होता. परंतु वैज्ञानिकांच्या मते, कपच्या आतील बाजूस मुख्यत्वे हायड्रोफोबिक फिल्मचा पातळ थर असतो आणि हा थर प्लॅस्टिक आणि काही वेळेस पॉलिमरपासून बनवलेला असतो.
असे होते आपले नुकसान – प्रोफेसर सुद्धा गोयल यांच्या मते, “आमच्या संशोधनानुसार एका पेपर कपमध्ये ठेवलेला १०० मिलिलीटर गरम पदार्थ (८५-९० ओसी) २५,००० मायक्रॉन आकाराचे (१० मायक्रॉनचे १००० मायक्रॉन) सूक्ष्म कण सोडतो आणि ही प्रक्रिया १५ मिनिटात पूर्ण होते. हे सक्षम प्लास्टिक विषारी धातूंमध्ये म्हणजेच पॅलेडियम, क्रोमियम आणि कॅडमियममध्ये आढळतात. ही सेंद्रिय संयुगे नैसर्गिकरित्या विरघळणारी नसतात परंतु वाहक म्हणून काम करतात म्हणजे शरीरात मात्र जातात. हे जर मानवी शरीरात गेले तर त्यांचा गंभीर परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतो.
पूर्ण प्रक्रियेसाठी लागतात १५ मिनिटे – संशोधनकर्त्यांनी वेगवेगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून हे संशोधन केले. पहिल्या प्रक्रियांमध्ये त्यांनी गरम आणि स्वच्छ पाणी (८५-९० •C; pH~6.9) एका पेपर कपमध्ये ओतले व तो कप १५ मिनिटे तसाच ठेवून दिला. नंतर त्या पाण्याचे जेव्हा संशोधकांनी विश्लेषण केले, तेव्हा त्यात इतर प्लास्टिक कणांसोबत इतर अतिरिक्त आयन सुद्धा उपस्थित होते. तर दुसऱ्या प्रक्रियेमध्ये कागदाच्या कपांना स्वच्छ (पी-एच /6.9) उबदार पाण्यात (३०-४० डिग्री सेल्सिअस) त्यांना बुडवून ठेवले.
त्यांनतर हायड्रोफोबिक फिल्मला काळजीपूर्वक त्या कागदावरून वेगळे केले गेले आणि १५ मिनिटांसाठी गरम व स्वच्छ पाण्यामध्ये (८५-९० •C; pH~6.9) ठेवले. त्यांनतर त्या प्लास्टिक फिल्मला गरम पाण्यात ठेवण्याआधी आणि ठेवल्यांनंतर त्याचे भौतिक, रासायनिक आणि यांत्रिक गुणांद्वारे परीक्षण केले.
प्रो. गोयल यांनी सांगितले कि एका सर्वेक्षणामध्ये उत्तरदात्याने म्हटले की, चहा किंवा कोफी कपमध्ये ओतल्यानांतर १५ मिनिटांच्या आधी त्यांनी ते पेय प्यायले होते. या उत्तराच्या आधारावरच संशोधनसाठीचा वेळ निश्चित केला होता. या सर्वेक्षणाच्या परिणामांशिवाय याच वेळेच्या कालावधीत ते पेय आपल्या सभोवतालच्या वातावरणातीळ तापमानाशी अनुरूप झाले.
तर मग आता हा प्रश्न उद्भवतो की चहा कशामधून प्यावा? या स्थितीपासून वाचण्यासाठी आपण पारंपरिक मातीच्या उत्पादनांचा डिस्पोसेबल उत्पादनांच्या जागी वापर केला पाहिजे. चहा कशामधून प्यावा? या प्रश्नावर आयआयटी खड्गपूरचे निर्देशक वीरेंद्र के तिवारी यांनी सांगितले की, या संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की, इतर कोणत्याही उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहित करण्यापूर्वी ते उप्तादन आपल्या पर्यावरणाला व सजीव सृष्टीला घातक तर नाही ना हे आधी पाहिलं पाहिजे.
आपण प्लास्टिक आणि काचेच्या उत्पादनांच्या वापरापेक्षा डिस्पोसेबल उत्पादने वापरण्यास प्रोत्साहित करण्यास खूप घाई केली होती. त्यापेक्षा आपण पर्यावरणाला अनुकूल अशा उत्पादनांचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे होते. पारंपारिकपणे भारत हा एक स्थायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा देश आहे आणि आता परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या भूतकाळातील अनुभवांकडून आपण शिकले पाहिजे अशी वेळ आता आली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !