Headlines

या पद्धतीने महिनाभर तरी चेहरा वरील उजळपणा टिकून राहील, घरबसल्या गुलाबपाण्याने १० मिनिटात असे करा फेशियल !

छान सुंदर गोरेपान दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी मुली मार्केटमधील अनेक वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट वापरतात तर काहीजणी खास डॉक्टरांकडे जाऊन त्यावर ट्रीटमेंट करतात. नाहीतर ब्युटीपार्लरमध्ये जाऊन हजार रुपये खर्च करतात. पण आता असे करण्याची गरज नाही.

फेशियल करण्यासाठी आता महागड्या क्रिम गरज पडणार नाही तुम्ही घरच्या घरी गुलाब जल वापरून फेशियल करू शकता. गुलाब जल चेहऱ्याच्या त्वचेतील पीएच लेवल संतुलित राखण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतील बंद चित्रे उघडण्यास मदत होते आणि त्वचेला चमक येते. गुलाब जल चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या, ब्लॅक हेड्स, डार्क स्पोर्ट्स घालवण्यास मदत करते.

आज आम्ही तुम्हाला घरातच गुलाब जल द्वारे फेशियल कसे करतात हे शिकवणार आहोत. लक्षात ठेवा फेशियलच्या पाच मुख्य पायऱ्या असतात. त्या म्हणजे क्लिजिंग, एक्सफोलिएसटिंग, मसाज, फेस पॅक आणि मॉइश्चरायझिंग. या पायर्‍या एका पाठोपाठ एक कराव्यात.

१) क्लिजिंग – साहित्य- दोन चमचे गुलाब जल आणि एक चमचा कच्चे दुध
कृती- एका वाटीत एक चमचा कच्चे दुध घ्या आणि त्यात दोन चमचे गुलाबजल मिसळा. गुलाब जल हे उत्तम क्लिंजर आहे. जो त्वचेवरील तेलकटपणा घालवतो. तसेच त्वचेवरील छिद्रात असलेला तेलकटपणा घालवण्यासाठी मदत करते. तयार मिश्रणात एक कापसाचा गोळा घाला आणि तो भिजवून चेहरा साफ करा. यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण आणि धुळीचे कण निघून जातील.

२) स्क्रबिंग – साहित्य- एक चमचा साखर आणि दोन चमचे गुलाब जल.
कृती- एका वाटीत एक मोठा चमचा साखर घ्या आणि त्यात दोन चमचे गुलाब जल मिसळा. मिश्रण चांगले ढवळून घ्या. तयार झालेले मिश्रण थोडे हातात घेऊन चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करा.

१-२ मिनिटे नीट मसाज करा. साखर त्वचेला मुलायम बनवण्यास मदत करते. हे मिश्रण डेड सेल्सला काढून त्याजागी नवीन सेल्स तयार करण्यात मदत करते. मसाज नंतर तुमच्या चेहऱ्याला थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

३) फेशियल मसाज – साहित्य- एक चमचा मध आणि एक चमचा गुलाब जल
कृती- एका वाटीत एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल घेऊन चांगले मिसळा. हे मिश्रण थोडे थोडे घेऊन बोटांनी चेहऱ्याला मसाज करा. २/३ मिनिटे सर्क्युलर मोशन मध्ये चेहऱ्यावर मसाज करत रहा. मध त्वचेला मऊ आणि हायड्रेट बनवते. मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

४) फेस पॅक – साहित्य- एक चमचा चंदन पावडर आणि दोन चमचे गुलाब जल
कृती- एका पार्टीत एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात दोन चमचे गुलाब जल घालुन मिश्रण घट्ट होईपर्यंत मिसळा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्याला लावा. तो १०/१५ मिनिटे चेहऱ्यावरच राहू द्या. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. या पॅकला अँटी एजिंग मास्क म्हणून देखील वापरले जाते. हा पॅक चेहऱ्यावरील छिद्र बंद करून त्वचेला कसण्यास मदत करते.

५) मॉइश्चरायझिंग – साहित्य – दोन चमचे गुलाब जल आणि एक चमचा ग्लिसरीन
कृती- एका वाटीत दोन चमचे गुलाब जल घेऊन त्यात एक टेबल्स्पून ग्लिसरीन घाला. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही या मिश्रणात एक विटामिन ई ची कॅप्सूल घालू शकता. मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. आणि हलक्या हाताने चेहऱ्याला लावा.

थोड्यावेळाने मसाज करा जेणेकरून हे मिश्रण त्वचेत चांगले मुरेल. मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. यामुळे तुमची त्वचा रुक्ष पडत नाही.

हा फेशियल दर 30 दिवसांनंतर तुमच्या चेहऱ्याला लावून पहा. तुमच्या चेहऱ्यावरील उजळपणा तीस दिवस तसाच राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप –  लेखातील माहिती हि आपल्या सामान्य माहितीसाठी आहे. आपल्याला गुलाबपाण्याची ऍलर्जी वगैरे आहे का ते आधी तपासून घ्यावे. आपल्याला काही ऍलर्जी वगैरे किंवा लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.