भारतात चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याची सवय प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी या वेगवेगळ्या. काहींना तिखट खायला आवडते तर काहींना गोड. पण या पदार्थांच्या अतिसेवनामुळे अनेक जण स्वतःवर आजारपण ओढावून घेतात. अतितिखट खाल्ल्यामुळे अनेकांना पोटाचे विकार होतात. तर अति गोडाच्या सेवनामुळे लोकांना डायबिटीस चा त्रास होतो. हे आजार एकदा का पाठी लागले की म्हातारपणापर्यंत आपल्याला त्याची भरपूर काळजी घ्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरांकडून सतत खाण्यापिण्यावर पथ्य पाळण्याचे सल्ले दिले जातात.
मागील काही वर्षांपासून भारतात डायबिटीस होण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा आजार जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळायचा मात्र हल्ली या आजाराचे प्रमाण युवकांमध्ये देखील दिसू लागले आहे. हल्लीचे युवक खाण्यापिण्याची पथ्ये पाळत नाहीत. तसेच डायबिटीस सारख्या आजाराला गांभीर्य देत नाहीत त्यामुळे त्यांच्यात हे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जातो.
डायबिटीस हा एक गंभीर आजार असून त्याला स्लो कि’ल’र देखील म्हटले जाते. या आजारावर कोणतेही औषध नाही. यावर मात करायची असेल तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर पथ्य पाळावे लागतील तसेच तुमच्या जीवनशैलीत थोडा बदल करावा लागेल. हा एक असा आजार आहे ज्यामुळे हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात.
साधारणपणे गोड खाल्ल्याने डायबेटिस होतो हा एक समज आहे. मात्र केवळ गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होत नाही यासाठी अजूनही काही कारणे आहेत. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला डायबीटीस होण्याची अन्य कारणे सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही सतर्क होऊ शकता व स्वतःची काळजी घेऊ शकता.
डायबिटीस कसा होतो?
डायबिटीस दोन प्रकारचा असतो. टाईप वन, टाईप टू. ज्यावेळी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती इन्सुलीन तयार करणाऱ्या पेशींना मा रू न टाकते त्यावेळेस टाईप वन चा डायबिटीस होतो. तर टाईप टू डायबिटीस मध्ये शरीरात इन्सुलिन तयार होते. मात्र ते शरीराला जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणात नसते. शरीरात योग्य मात्रेत इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.
डायबिटीस ची पाच कारणे – १. जेव्हा शरीराच्या स्वादुपिंडातील ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा देखील डायबीटीस होण्याची शक्यता असते. या ग्रंथींमधून इन्सुलिन आणि ग्लू का गो न यांसारखे हा र्मो न्स बाहेर पडतात. इन्सुलिन मार्फत शरीराच्या सर्व अवयवां मध्ये शुगर पोहोचवण्याचे काम केले जाते. शरीरातील इन्सुलिनची कमी निर्मिती झाल्यास शरीरात शुगर लेवल वाढून डायबीटीस होण्याची शक्यता असते.
२) डायबिटीस होण्यापाठी जंक फूड हेदेखील एक कारण ठरू शकते. जंग फूड मध्ये फॅट्स चे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते. यामुळे तुमचे वजन वाढते. वजन वाढल्यामुळे शरीरात इन्सुलिन जास्त तयार होत नाही. आणि शरीरातील शुगर लेव्हल वाढते.
३) डायबिटीज काहीवेळा अनुवंशिकतेमुळे देखील होतो. जर तुमच्या परिवारातील आई-वडील किंवा भाऊ बहीण पैकी कोणालाही डायबिटीस चा आजार असेल तर तुम्हाला देखील डायबिटीस असण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या परिवारात कोणाला डायबिटीस असेल तर तुम्ही देखील वेळोवेळी तुमच्या शरीरातील शुगर लेवल तपासून घेत जा, आणि सोबतच नियमित व्यायाम करा.
४) वजन जर प्रमाणापेक्षा अधिक वाढत असेल तर तुमच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी होत जाते. वजन वाढल्यामुळे तुम्हाला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शरीरात इन्सुलिन योग्य मात्र तयार न झाल्यास त्या बदली शरीरातील साखरेची पातळी वाढत जाते. यामुळे डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही ते नेहमी संतुलित राहील याची काळजी घ्या. यासाठी नियमित व्यायाम करावा.
५) कामानिमित्त म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमचा अधिकतर वेळ हा जर बसूनच जात असेल तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. तुमची शारीरिक मेहनत होत नसेल तर तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊन र*क्तात शुगर वाढण्यास सुरुवात होते. यामुळे पुढे जाऊन डायबिटीस होण्याचा धोका संभवतो.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल व यातील माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटत असेल तर नक्की लाईक करा. व तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.