Headlines

कोणतीही महागडी क्रीम न लावता या सोप्या घरगुती उपायांनी पूर्णपणे घालवा गर्भावस्थेनंतर आलेले स्ट्रेचमार्क्स !

कोणत्याही महिलेसाठी तिचे मातृत्व ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. नऊ महिने पोटात वाढविल्यानंतर जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्राप्त होते. मात्र बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या शरीरात काही बदल होतात. बरेचदा बाळाच्या जन्मानंतर स्त्रीच्या पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. जे दिसण्यास फारच वाईट असतात.

त्यामुळे बाहेर पडल्यावर ते स्ट्रेच मार्क दिसू नाही यासाठी स्त्रिया अतोनात प्रयत्न करतात. प्रेग्नेंसी च्या काळात स्त्रियांना अनेक त्वचेच्या एलर्जी ला सामोरे जावे लागते. यामध्ये चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, केस गळती आणि सर्वात मोठी समस्या स्ट्रेच मार्क्स या गोष्टींचा समावेश असतो.

वजन वाढल्यामुळे किंवा वाढत्या वयासोबत पोटावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर रेषांचे हलके डाग दिसू लागतात. यामुळे आपली त्वचा खराब दिसू लागते. त्यामुळे शरीराच्या त्या भागाला आपल्याला झाकून ठेवावे लागते.

पहायला गेल्यास ते फक्त निशाण असतात मात्र काही विशेष प्रसंगी आपल्याला काही विशेष कपडे परिधान करायचे असतात मात्र अशावेळी या स्ट्रेच मार्क्स मुळे आपण ते कपडे परिधान करू शकत नाही.
सध्या या स्ट्रेच मार्कला लपवण्यासाठी अनेक महागडी औषधे बाजारात उपलब्ध आहेत. परंतु सगळ्यांनाच ही महागडी औषधे परवडतील असे नाही. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खास काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटावरील स्ट्रेच मार्क्स निघून जाण्यास मदत होईल.

एलोवेरा जेल – स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी एलोवेरा जेल फार महत्त्वाचे ठरते. हे जेल त्वचेमध्ये ओलावा आणते. शिवाय स्ट्रेच मार्क्सचे प्रमाण जास्त असल्यास त्या ठिकाणी खाज जास्त येते. यासाठी दिवसातून दोनदा एलोवेरा जेल लावून स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी मालिश करा याने भरपूर फायदा होतो.

कॅस्टर ऑईल / एरंडी तेल – कॅस्टर ऑईल सुद्धा स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी फायदेशीर ठरते. कॅस्टर ऑईल स्ट्रेच मार्क आलेल्या ठिकाणी लावल्यावर ती जागा प्लास्टिक ने झाकावी व वरतून गरम पाण्याच्या बॉटलने अर्धा तास शेक द्या. त्यानंतर थोडी मालिश करा. असे केल्यास काही दिवसातच स्ट्रेच मार्क्स निघून जातील.

अंड्याचा पांढरा भाग – अंड्याच्या पांढर्‍या भागात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. हे प्रोटिन्स त्वचेचे रक्षण करतात. अंड्याचा पांढरा भाग काढून ते स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी लावा. त्यानंतर १०/१५ मिनिटांनी कोमट पाण्याने साफ करा.

ऑलिव ऑइल – ऑलिव्ह ऑइलमध्ये विटामिन ई आणि ओमेगा फॅटी ऍसिड यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. ऑलिव ऑइल त्वचेसाठी भरपूर गुणधर्मांनी युक्‍त असते असे मानले जाते. ऑलिव ऑइल लावल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू अदृश्य होत जातात. आंघोळ केल्यानंतर ऑलिव्ह ऑइलने त्या स्ट्रेचमार्क ला हळू हळू मसाज करा. त्यासोबतच रात्री झोपतेवेळी ऑलिव ऑइल हलकेसे गरम करून पोटाला लावा‌.
लिंबाचा रस – स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी लिंबाचा रस भरपूर फायदेशीर ठरू शकतो. लिंबाचा रस आला कमीत कमी दहा मिनिटे स्ट्रेच मार्क्स आलेल्या ठिकाणी लावा. याचा फरक लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.