Headlines

जामिनावर बाहेर आलेली अभिनेत्री केतकी चितळे परत पवार साहेबांबद्दल बोलली, म्हणाली पवार म्हणजे काय ….?

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. केतकीची ४० दिवसांनी जेलमधून सुटका करण्यात आली आहे. जेलमधून बाहेर आल्यावर तिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने ठाण्याच्या जेलमध्ये असताना तिच्यासोबत कशाप्रकारे व्यवहार करण्यात आला याबद्दल सांगितले.

एका मुलाखतीत केतकीने सांगितले, मी जेलमध्ये असताना माझ्यासोबत छेडछाड केली गेली. मी साडी घातली होती. तेव्हा जबरदस्ती माझी साडी खेचण्याचा प्रयत्न केला. मी खाली पडली तेव्हा माझ्यावर अंडी , शाही , रंग फेकला गेला. माझ्या छातीला हात लावण्याचा प्रयत्न केला गेला.

केतकी पुढे म्हणाली, मला वॉरेंट नसताना अटक करण्यात आली होती. मी काहीच चुकीचे केले नव्हते तरी माझ्यासोबत अशाप्रकारे व्यवहार करण्यात आला. मी केवळ एक कविता पोस्ट केली म्हणून मला कोणतीही सूचना न देता अटक केली. मी कोणावर ही निशाणा साधला नव्हता पण लोकांनीच ती कविता शरद पवारांशी जोडली. आणि माझ्यावर २२ एफआयआर नोंदवले गेले.

केतकीने पोस्ट केलेल्या कवितेत ब्राम्हणांची अवहेलना करणारे शरद पवार असे म्हटले होते. केतकीसोबतच एक फार्मेसी स्टुडेंट असलेल्या निखिल भामरेला सुद्धा त्याच्या अपमानास्पद ट्विटमुळे अटक करण्यात आली होती.

केतकीने सांगितले की तिच्यावर एका पोस्टसाठी 22 एफआयआर नोंदवले. त्यातल्या एकावरच जामीन मिळाला आहे. बाकी 21 एफआयआर आणखी आहेतच. मी जे काही म्हटले त्याचे मला भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. पण लोकांनी जर मला चुकीचे समजले तर मी काही करु शकत नाही. पवार काही कोणता धर्म नाही. मी कोणतेही कारण नसताना कायद्याच्या तुरुंगात होती.

केतकीने स्टार प्रवाह वरील आंबट गो़ड, झी मराठीवरील तुझं माझं ब्रेकअप आणि सोनी टीव्हीवरील सास बिना ससुराल या मालिकांमध्ये पाहिले आहे. सध्या ती 29 वर्षांची आहे. तसेच ती एक्सेप्ट एपिलेप्सी संस्थेची संस्थापक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !