Headlines

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली !

विक्रम गोखले एक हाडाचा कलाकार, जिवंत अभिनयाचे एक उत्कृष्ट उदाहरण होते. थियेटर, टिव्ही, हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप त्यांनी पाडली आहे. कोणतेही पात्र, त्यांची भूमिका अत्यंत शिताफिने त्यांनी निभावली.

विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. विक्रम गोखलेंच्या जाण्याने इंडस्ट्रीमध्ये कधीच न भरणारी पोखळी निर्माण झाली आहे. या घटनेमुळे सगळ्यांनाच दुःख झाले आहे. अनेक मोठमोठे अभिनेते अभिनेत्रींनी या घटनेवर ट्वीट केले आहे.

विक्रम गोखले यांनी फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदी सिनेमांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले देखील मराठी थियेटर आणि चित्रपटातले दिग्गज अभिनेते होते. अभिनयासोबतच विक्रम गोखले यांनी आघात या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते. हिंदी आणि मराठीतील कित्येक हिट चित्रपटात त्यांनी काम केले आहे. या सोबतच विक्रम गोखले यांची पुण्यामध्ये सुजाता नावाची रिअल इस्टेट एजन्सीसुद्धा आहे.

विक्रम गोखले गेल्याची अफवा – गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांची तब्येत जास्त झालेली असल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यांची तब्येत जास्त बिघडलेली असल्याने डॉक्टर त्यांना शक्य आहे तेवढे प्रयत्न करत होते. त्यांचा इलाज सुरु असतानाच्या दरम्यानच विक्रम गोखले गेल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. पण त्यानंतर ही बातमी खोटी असल्याचे देखील सांगितले गेले. सोशल मीडियावर सगळीकडे ही बातमी वायरल होत होती. पण या वेळेस त्यांची तब्येत जास्तच क्रिटिकल झाली होती.

विक्रम गोखले यांनी कित्येक हिट चित्रपट आणि शोमध्ये काम केले आहे. हम दिल दे चुके सनम, भुल भूलैया, अग्निपथ, खुदा गवाह यासारख्या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. आतापर्यंत विक्रम गोखलेंनी जेवढे चित्रपट केले त्या प्रत्येक चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते.

२०१० मध्ये त्यांना मराठी चित्रपट अनुमतीसाठी बेस्ट ऍक्टरचा नॅशनल ऍवोर्ड देखील मिळाला. विक्रम गोखले यांचं कुटुंब चित्रपटसृष्टीशीच निगडित आहे. विक्रम गोखले यांनी त्यांचा पहिला चित्रपट अमिताभ बच्चन सोबत केला होता.

खरं सांगायचं तर, जावई माझा भला, कथा यासारख्या नाटकंमध्ये देखील विक्रम गोखले यांनी काम केले आहे. या सोबतच दूरदर्शन, झी मराठी, झी टीव्ही, स्टार प्रवाह या चॅनलवरील अनेक मालिका शो यांच्यामध्ये देखील त्यांनी काम केले आहे. विक्रम गोखलेंनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांच्याच मनात घर केले आहे.

त्यामुळे आता त्यांच्या जाण्याने सगळ्यांच त्यांची कमी भासत आहे. शेवटपर्यंत विक्रम गोखले यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांचा अभिनय अत्यंत जिवंत होता ही अभिनयाची त्यांची शैली सगळ्यांनी शिकण्यासारखी आहे. आजकाल फार कमी असे कलाकार आहेत ज्यांचा अभिनय इतका परफेक्ट आहे.

आज २६/११ रोजी त्यांचे दुःखत निधन झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !