Headlines

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून या प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्सिट, वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

सध्या स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरलीय. या मालिकेतील अप्पू शशांकची प्रेमकहाणी, कुक्की गॅंग प्रेक्षकांना भावते आहे. शिवाय या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना अगदी घरातले असल्यासारखे वाटतात. त्यामुळे हे पात्र माझ्यासारखं आहे. किंवा मी अगदी अशीच आहे अशा कमेंट या मालिकेच्या पोस्टवर पाहायला मिळतात.

सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात गुण्या गोविंदाने नांदणारी एकत्र कुटुंब पद्धती हा या मालिकेचा मुळ मुद्दा आहे. पण या मालिकेच्या बाबतीत एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे मालिकेत अप्पूच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी तिची वहिनी म्हणजेच अभिनेत्री अमृता फडकेने ही मालिका सोडली आहे.

गेले काही दिवस अम़ता या मालिकेत दिसत नव्हती. मालिकेत ती माहेरी गेली असल्याचे सीन्स दाखवण्यात येत होते. पण आता अमृताने ती मालिका सोडल्यामुळे ती इतके दिवस मालिकेत दिसली नसल्याचे स्पष्ट झाले. आता अमृताच्या जागी अभिनेत्री सई कल्याणकर मानसी वहिनीची भुमिका साकारणार आहे. लवकरच मालिकेत वटपौर्णिमेचा भाग प्रदर्शित होईल तेव्हा आपल्याला नव्या मानसी वहिनीची एन्ट्री पाहायला मिळेल.

काही दिवसांपुर्वीच या मालिकेतील नेत्रा हे पात्र साकारणाऱ्या स्नेहलता माघाडेने तिच्या पुढील शिक्षणामुळे मालिका सोडली होती. आता अभिनेत्री अमृता फडकेने ही मालिका सोडली आहे. पण तिचे मालिका सोडण्यामागचे कारण अजून समोर आलेले नाही. अमृताने यापुर्वी झी युवा वरील गर्लस् हॉस्टेल या मालिकेत काम केले होते. पण तिला खरी ओळख ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील मानसी वहिनी या पात्रामुळे मिळाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !