Headlines

प्राजक्ता माळी पुन्हा आली चर्चेत, शूटिंग दरम्यान या कारणामुळे तिला उलट्या यायला लागल्या !

सध्या टीव्ही ऑन केली की राजकारणातल्या बातम्यांचा वर्षाव सुरु होतं. कोणतंही बातम्यांच चॅनल सुरु केलं की त्यावर राजकारणी लोक सत्तेसाठी काय करतात हे सांगण्यात येत असतं. ते सतत पाहून सध्याचा तरुणवर्ग हा राजकारणाकडे खुप आकर्षित होत आहे. सत्ता म्हटली की, फसवणूक, जोर जबरदस्ती, बळजबरी या गोष्टी आल्या.

सध्या या गोष्टी चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्यामध्ये देखील सहज दाखवल्या जातात. यामध्ये देखील तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर बंडखोरीने वागावेच लागेल हेच दाखवलं जातं तरंच समाज तुमच्या हाताशी येतो. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी रेगे हा चित्रपट काढला. त्यात मुलांना सत्तेचे आकर्षण कशाप्रकारे वाटतं. त्यासाठी त्यांची कोणत्या प्रकारची मानसिकता असते हे चित्रपटातून दाखवलं होतं. हा चित्रपट त्यावेळी बॉक्सऑफिसवर खूप चालला. आता पुन्हा एकदा अभिजीत पानसे एक नवीकोरी वेबसिरीज घेऊन आले आहेत.

ही वेबसिरीज सत्तापिपासू लोकांवर आधारित आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यात प्रमुख भूमिकेत असून रानबाजार असे या वेबसिरीजचे नाव आहे. महाराष्ट्रातलं राजकारण, पत्रकार, मीडिया, पोलीस यासर्व गोष्टींसोबत सत्तेसाठी से’क्स’च्या आधार कसा घेतला जातो या गोष्टी दाखवल्या आहेत. प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडीतने या वेबसिरीजमध्ये बरेच बोल्ड सीन दिले आहेत.

से’क्स’ला वाईट ठरवुन त्यावरुन लोकांचं चरित्र मोजमाप करण्याची जी पद्धत रुजली यातुनच से’क्स स्कॅं’ड’ल, ह’नि’ट्रॅ’प वा तत्सम गोष्टी निर्माण झाल्या. ह’नि’ट्रॅ’प आणि राजकारण जोडलं तर किंती भयंकर ईंटरेस्टींग संयुग तयार होईल हेच रान-बझार मध्ये अतिशय रंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

या सिरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे तब्बल 9 किलो वजन वाढवले होते. चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगताना ती म्हणते की, मला या भूमिकेसाठी वजन वाढवणे गरजेचे होते. जेव्हा तिला वजन वाढवणे सोपे की कमी करणे असा प्रश्न विचारला त्यावर वजन वाढवणे असे प्राजक्ताने उत्तर दिले. प्राजक्ताच्यामते आपण जेव्हा वजन कमी करतो तेव्हा आपण काय खावे काय खाऊ नये याबाबत आपल्याला माहिती असते शिवाय कोणता व्यायाम करायचा हे देखील ठाऊक असतं.

मात्र वजन वाढवताना तसे काहीच नसते. फक्त जास्त खाऊन वजन वाढवायचे एवढेच माहित असल्यामुळे त्यावेळी मी जे मिळेल ते खात होती. माझं शरीर इतके अन्न स्विकारत नव्हते तरी मी खात होते. पण त्याचा नंतर मलाच त्रास होऊ लागला. शुटींग दरम्यान मला उलट्या आणि लूज मोशनचा त्रास होऊ लागला. नंतर हळूहळू शरीराला जास्त खायची सवय झाली आणि माझे वजन वाढले. शुटींग झाल्यावर मात्र प्राजक्ताने पुन्हा तिच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केले.आणि पुन्हा तिचे वजन पुर्ववत केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !